उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील, तो निवडून येईल; ‘मातोश्री’वरील भेटीनंतर जयंत पाटलांचं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेत बंडखोरी झाली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार कोसळलं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आलं आहे. दीड दोन महिन्यांच्या काळात झालेल्या या उलथापालथीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई Takशी बोलताना भाष्य केलं.

“शिवसेनेची मोडतोड होईल, असं तुम्ही म्हणालात. आमदार गुवाहाटीत गेल्यानंतर ते परत येतील, असं शिवसेनेतून आणि तुम्हीही म्हणाला होता. पण कुणीही परत शिवसेनेत परतलं नाही. याबद्दलचं तुमचं आकलन चुकलं का?”, या प्रश्नावर जयंत पाटील यांनी भूमिका मांडली.

“उद्धव ठाकरेंनी जास्त विश्वास टाकला. ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असावेत असं मला वाटतं. त्यांना असं वाटत होतं की, रोज बोलणारी लोक कसे सोडून जातील, या कल्पनेत ते असावेत. नक्की काय झालं याबद्दल त्यांनाच विचारलं पाहिजे. आमदारांना पकडून ठेवणं, हे त्यांनी अजिबात केलं नाही. त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर असणारी माणसंही निघून गेली. त्यांचा पक्ष आणि त्यामुळे कसा चालवायचा हा निर्णय त्यांचा आहे”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील, तो निवडून येईल -जयंत पाटील

“काल भेटल्यानंतरही आम्हाला एक विश्वास त्यांच्यात दिसला की, जो उमेदवार ते देतील. तो उमेदवार निवडून येईल. शिवसेनेनंही अनेकदा करून दाखवलं आहे. ४० जण गेलेत, त्यातील ४-५ जण सोडले, तरी बाकीचे निवडून येणं अवघड आहे. फुटलेल्या आमदारांनीही हा विचार केलेला असणार आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

‘बंडाच्या काळात उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर थेट प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यांची वेळ न देण्याची पद्धत, न भेटण्याची पद्धत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात विशिष्ट पद्धतीने काम करण्याची सवय होती. तशी पद्धत उद्धव ठाकरेंकडे नव्हती. त्यातून तक्रारी येत होत्या. पक्षाचे नेते म्हणून चांगले आहेत, पण मुख्यमंत्री म्हणून तुमचं आकलन काय?’, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

ADVERTISEMENT

कोरोना परिस्थिती हाताळणीबद्दल जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंचं केलं कौतुक

या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले,”एक गोष्ट मान्य केली पाहिजे की, त्यांना प्रशासन चालवण्याचा अनुभव नव्हता. या तिन्ही पक्षाची गरज म्हणून ते मुख्यमंत्री झाले. कोरोना येण्याआधी त्यांनी प्रचंड धडाक्यानं काम सुरू केलं होतं. ते मंत्रालयात येत होते. कोरोना आल्यानंतर त्यांनी बंधन पाळून कोरोनावर लक्ष्य केंद्रीत केलं. कोरोनाबद्दल जगातील आणि देशातील तज्ज्ञांशी बोलणं, कोरोना नियम यावर ते पूर्णवेळ लक्ष देत होते. त्यामुळे भारतात कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राने ही परिस्थिती चांगली हाताळली”, असं जयंत पाटील म्हणाले.

ADVERTISEMENT

“उद्धव ठाकरे उमद्या मनाचा माणूस, ते चांगल्या गोष्टींसाठी उत्साही असायचे”

“कोरोना काळात वेगवेगळ्या मर्यादा होत्या. तरीही ते मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहायचे. कोरोना कमी होत असतानाच त्यांच्या मणक्याचा आजार बळावला. ऑपरेशन करावं लागलं. त्या काळातील दोन-तीन महिने होते, त्यावेळी त्यांना कार्यालयात येता आलं नाही. याच काळात या कंड्या पिकवल्या गेल्या. माणूस म्हणून ते जंटलमन आहेत. ते उमद्या मनाचे आहेत. मुख्यमंत्री म्हणूनही चांगलं काही करण्यासाठी ते नेहमीच उत्साही असायचे. आता न भेटण्याची कारण मी सांगितली. तो काळ मोठा होता. भेटत नाही, हे सांगण्याची विरोधकांना ही संधी मिळाली. ऑपरेशन झालं तेव्हा त्यांची परिस्थिती गंभीर होती. त्यांनी त्यावर मात केली. पुन्हा त्यांनी जबाबदारी खांद्यावर घेतली आणि हे सगळं खूप कौतुकास्पद आहे.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT