'माझ्यावरील हल्ल्याच्या कटात जयंत पाटील, पोलीस अधीक्षकांचा सहभाग'; पडळकरांचा खळबळजनक आरोप

'माझ्यावरील हल्ल्याच्या कटात जयंत पाटील, पोलीस अधीक्षकांचा सहभाग'; पडळकरांचा खळबळजनक आरोप
jayant patil superintendent of police involved in conspiracy to attack me mlc gopichand padalkar sensational allegation(फाइल फोटो)

सांगली: 'माझ्यावर झालेला झालेला हल्ला पूर्वनियोजित होता. आणि हल्ल्याच्या कटात पालकमंत्री जयंत पाटील, पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक एस.पी मनिषा डुबुले हे सामील होते.' असा गंभीर आरोप भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे 7 नोव्हेंबर झालेला माझ्यावरील हल्ला पूर्वनियोजीत होता. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील, पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक एस.पी मनिषा डुबुले हे हल्ल्याच्या कटात सामिल होते असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यावेळची एक व्हिडिओ क्लिप दाखवत आमदार पडळकर यांनी हा आरोप केला आहे.

आटपाडी येथे 7 नोव्हेंबर रोजी सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वादातून मारामारी झाली होती. भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये हा राडा झाला होता. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्या सहित दोन्ही गटातील 10 लोकांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

आटपाडी पोलीस ठाण्यात पडळकर आणि पाटील यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पडळकर यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू नानासो जानकर (वय 29, रा. भेंडवडे, ता. खानापूर) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती

jayant patil superintendent of police involved in conspiracy to attack me mlc gopichand padalkar sensational allegation
Gopichand Padalkar: आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

तर राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आम्ही आंदोलन उभं केलं आहे. त्यामुळेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. असा प्रत्यारोप त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in