आधी विधानसभेत आता ट्विटर! जितेंद्र आव्हाड-राम सातपुते भिडले, काय झालं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Jitendra Awhad And Ram Satpute : विधानसभेत गुरुवारी राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार (BJP MLA) राम सातपुते यांच्यात सुरू झालेला आरक्षणावरील वाद आता विधिमंडळाबाहेरही सुरू झालाय. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट (Tweet) करत राम सातपुते यांच्यावर वार केला. सातपुते यांनी ट्विट करत जितेंद्र आव्हाडांवर पलटवार केला आहे. (Maharashtra Political Update)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलंय की, “वैचारिक गोंधळ झाला की, काय होतं याचे उत्तम उदाहरणं म्हणजे काल विधानसभेमध्ये झालेली चर्चा. आमदार राम सातपुते हे माझ्या वडिलांनी चप्पल शिवली याचा मला अभिमान आहे असे म्हणाले. मलाही माझ्या आजोबांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर हमाली केली याचा अभिमान आहे.”

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, “पण, ज्या व्यवस्थेने माझ्या आजोबांना हमाली करायला लावली आणि ज्या व्यवस्थेने त्यांच्या वडिलांना चप्पला शिवायला लावल्या; त्या व्यवस्थेच्या बाजूने उभं राहण हा तद्दन मूर्खपणा आहे. त्या व्यवस्थेबरोबर लढणं हेच आपलं कर्तव्य आहे. वैचारिक गोंधळ झाला की, असे प्रश्न तयार होतात”, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राम सातपुते यांना लक्ष्य केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“अजितदादांनी सहशिवसेनाप्रमुख होण्याची संधी गमावली…” : CM शिंदेंचा टोमणा

जितेंद्र आव्हाडांना उत्तर… राम सातपुतेंनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना आमदार राम सातपुते म्हणाले, “माझा कोणताही वैचारिक गोंधळ झालेला नाही, पण आपला वैचारिक गोंधळ पूर्ण राज्याला माहित आहे. आपण आपल्या हिंदू द्वेषामुळे हिंदू समाजात आज अस्तित्वात नसलेल्या अनिष्ट रूढी परंपरांबद्दल बोलत असता कधी, तरी मुंब्र्याच्या बाहेर पडा म्हणजे तुम्हाला जरा हिंदू समाजाचं दर्शन होईल.”

ADVERTISEMENT

पुढे राम सातपुते यांनी असंही म्हटलं आहे की, “राहिला विषय व्यवस्थेचा, आज हिंदू समाज सर्व प्रकारचे भेदाभेद विसरून एक होत आहे; परंतु आपल्यासारख्या जातीवाद पेटवून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या लोकांना हे खपत नाही”, असा आरोप सातपुतेंनी आव्हाडांवर केला आहे.

ADVERTISEMENT

विधानसभेत जितेंद्र आव्हाड राम सातपुतेंना काय म्हणाले होते?

विधानसभेत बोलताना आव्हाड म्हणाले होते की,”माझ्याविरुद्ध राम सातपुते सर्वात जास्त बोलत होते. राम सातपुते, आपण ज्या मतदारसंघातून निवडून येता, तो राखीव आहे. तो राखीव कुणामुळे आहे माहितीये? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे. तुम्ही ज्या सनातन धर्माबद्दल बोलत होता, तो धर्म असता, तर तुम्ही इथे चाकरी करत सापडले असता. इथे तुम्ही आमदार म्हणून आले नसते.”

“माफी मागितली जाणार नाही”, अजित पवारांचा रौद्रवतार, विधानसभेत काय घडलं?

राम सातपुतेंनी जितेंद्र आव्हाडांना काय दिलं होतं उत्तर?

जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावर राम सातपुतें विधानसभेत म्हणाले होते की, “दलित आमदार म्हणून मला जितेंद्र आव्हाड अशा पद्धतीने हिणवत आहेत, हे चुकीचं आहे. हो, मी दलित आहे. मी हिंदू दलित आहे. माझ्या बापाने चपला शिवल्या त्याचा मला अभिमान आहे. अजून एक सांगतो, हो मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं म्हणून मी आमदार आहे. मला यांच्या पक्षाच्या शरद पवारने आरक्षण नाही दिलेलं. मी हिंदू दलित असल्याचा अभिमान आहे. मी सनातन हिंदू धर्मात जन्म घेतला याचा मला अभिमान आहे. हे चाकरी करत असतील, यांनी मला शिकवू नये. गर्व से कहो हम हिंदू है, दलित आमदारांचा असा अपमान करता याची लाज वाटली पाहिजे.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT