CCTV : प्लॅटफॉर्म व रेल्वेच्या मध्ये अडकला अन् गाडी झाली सुरू; कल्याण स्टेशनवरील घटना
कल्याण स्टेशनवर घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली...

CCTV : प्लॅटफॉर्म व रेल्वेच्या मध्ये अडकला अन् गाडी झाली सुरू; कल्याण स्टेशनवरील घटना

कल्याण स्टेशनवरील महिनाभरातील तिसरी घटना : प्लटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅपमध्ये पडलेल्या प्रवाशाला मिळालं नवं आयुष्य

मराठी भाषेत 'देव तारी त्याला कोण मारी' अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यक्ष प्रचिती सोमवारी (१५ नोव्हेंबर) कल्याण स्टेशनवरील अनेकांना आला. रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशांचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला. त्यातच रेल्वे धावायला सुरूवात झाली. हा सगळा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

कल्याण स्टेशनवर काय घडलं?

सोमवारी (१५ नोव्हेंबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हावडा एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकावर आली होती. या एक्स्प्रेसमध्ये एक प्रवासी चढत होता. चढत असतानाच त्याचा तोल गेला आणि हा प्रवाशी प्लॅटफॉर्म आणि एक्स्प्रेसच्या गॅपमध्ये पडला.

कल्याण स्टेशनवर घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली...
कल्याण CCTV व्हिडीओ : काळ आला होता, पण...; 'त्या' दोघी धावल्या म्हणून वाचले प्राण

अचानक ही घटना घडल्याने त्याला कळालंच नाही. त्यातच एक्स्प्रेस सुरू झाली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पॉईंट मॅन शिवजी सिंग यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी वायुवेगाने धावत या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढलं.

कल्याण स्टेशनवर घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली...
धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढताना पती-पत्नी गेले गाडी खाली; कल्याण स्थानकावरील थरार

बाहेर अचानक धावपळ सुरू झाल्याचं रेल्वेतील प्रवाशांनी बघितलं. बाहेर काहीतरी घडल्याचं लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरड केली आणि चैन पुलिंग करण्यात आली. त्यामुळे एक्सप्रेस देखील काही क्षणातच थांबली. सगळ्यांच्या प्रयत्ना यश आलं आणि त्या प्रवाशाला नवं आयुष्य मिळालं.

दीड महिन्यात तिसरी घटना

कल्याण रेल्वे स्थानकावर सातत्याने अशा घटना घडत आहे. गेल्या दीड महिन्यातील ही तिसरी घटना आहे. १ ऑक्टोबर रोजीही अशीच घटना घडली होती. कल्याण रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती एक्स्प्रेस गाडी स्थानकावरून सुटल्यानंतर बॅग देण्याचा प्रयत्न करत होती. बॅग देण्याच्या नादात व्यक्तीचा बॅगेसह तोल गेला आणि तो खाली कोसळला. महिला कॉन्स्टेबलनी धाव घेत त्याचे प्राण वाचवले.

३ नोव्हेंबर रोजीही अशीच घटना घडली. धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना हात सुटून पती-पत्नी चालत्या गाडी खाली गेल्याची कल्याण स्थानकात घडली होती. वेळीच चैन चैन खेचण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. प्रवासी आणि टीसीच्या मदतीने एक्स्प्रेस खाली गेलेल्या पती-पत्नीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in