"कंगनाचं डोकं का बधिर झालंय ते एनसीबीचे वानखेडेच शोधू शकतील"

अभिनेत्री कंगना रनौतच्या विधानावर शिवसेनेनं व्यक्त केला संताप : मोदी सरकारसह भाजपावर डागलं टीकास्त्र
"कंगनाचं डोकं का बधिर झालंय ते एनसीबीचे वानखेडेच शोधू शकतील"
अभिनेत्री कंगना रनौत आणि एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे...India Today

भारतीय स्वातंत्र्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौतने केलेल्या विधानावरून देशभरात पडसाद उमटू लागले आहेत. कंगना केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणी केली जात आहेत. शिवसेनेनंही कंगनाच्या वक्तव्याचा सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्याबद्दल कंगनाने केलेल्या विधानावरून शिवसेनेनं मोदी सरकार आणि भाजपवरही टीकास्त्र डागलं आहे.

शिवसेनेने अग्रलेखात काय म्हटलंय?

"भारतीय जनता पक्षातील पुरुष महामंडळ अधूनमधून बॉम्ब फोडण्याची भाषा करीत असतात. प्रत्यक्षात बॉम्ब कधीच फुटत नाहीत; पण भाजपाच्याच कंगनाबेन रानौत यांनी एक बॉम्ब फोडला असून त्यामुळे भाजपाच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली आहे. कंगनाबेन यांनी जाहीर केले आहे, 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही, तर भीक मिळाली. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 सालात मिळाले (म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यावर). कंगनाबेनच्या या वक्तव्याचे तीक्र पडसाद देशभरात उमटले आहेत."

अभिनेत्री कंगना रनौत आणि एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे...
कंगना रणौत विरोधात पुण्यातल्या चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

"भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या क्रांतिकारकांचा इतका भयंकर अपमान कधीच कोणी केला नव्हता. कंगनाबेन यांना नुकतेच 'पद्मश्री' या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आलं. यापूर्वी हा सन्मान भारतातील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या वीरांना मिळाला आहे. त्याच वीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाबेनलाही अशा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हे देशाचे दुर्दैव आहे."

"कंगनाबेन यांनी यापूर्वी महात्मा गांधींचाही अपमान केला. तिचे नथुरामप्रेमही उफाळून येत असते. तिच्या बरळण्याकडे एरव्ही कोणी फारसे लक्ष देत नाही. एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सुचतात असं एकदा टिळक म्हणाले होते. कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान ततोतंत खरे ठरते. 1947 साली स्वातंत्र्य मिळालेच नाही तर भीक मिळाली. पण या भीक मागण्याच्या प्रक्रियेत कंगनाचे सध्याचे राजकीय पूर्वज कोठेच नव्हते. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून देश मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यसंग्राम झाला. हजारो नव्हे तर लाखो जणांनी त्याकामी बलिदान केले."

अभिनेत्री कंगना रनौत आणि एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे...
...तर कंगना रणौत विरोधात अटक वॉरंट काढू; न्यायालयाने दिला गंभीर इशारा

"रक्त, घाम, अश्रू आणि त्यागातून मिळालेल्या आमच्या स्वातंत्र्याला 'भीक' असे संबोधणे हे राष्ट्रद्रोहाचेच प्रकरण आहे. अशा व्यक्तीस 'पद्मश्री' पुरस्कार देशाचे राष्ट्रपती देतात. त्या सोहळ्यास पंतप्रधान मोदी उपस्थित असतात आणि स्वातंत्र्यास भिकेची उपमा देणाऱ्या कंगनाबेनचे डोळे भरून कौतुक करतात. स्वातंत्र्य व क्रांतिकारकांच्या बलिदानाची थोडी जरी चाड असेल तर या राष्ट्रद्रोही वक्तव्याबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले पाहिजेत."

"शिवसेनेनं राष्ट्रवाद, हिंदुत्व गहाण ठेवल्याचे वक्तव्य भाजपवाले करीत असतात. महाराष्ट्रातील सत्ता गमावल्याचा तो जळफळाट असतो; पण त्यांच्या कंगनाबेनने तर भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सगळ्यांवरच अफू-गांजाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवले आहे. कंगनाबेनचे हे भिकार वक्तव्य ऐकून गुजरातमधील सरदार पटेलांचा जगातला उंच पुतळाही अश्रू ढाळत असेल."

अभिनेत्री कंगना रनौत आणि एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे...
Kangana Ranaut: कंगना चुकीचंच बोलली, पण 2014 पासून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अनुभव: चंद्रकांत पाटील

"कंगनाबेन यांच्या मते देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले. मोदींचे राज्य हेच स्वातंत्र्य. बाकी सगळे झूठ! या ऐतिहासिक विचारांशी भाजपातले वीर पुरुष सहमत आहेत काय? भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी कंगनाबेनच्या भिक्कार वक्तव्याचा धिक्कार केला आहे. हा देशद्रोहच आहे असे वरुण गांधी सांगतात. अनुपम खेर यांनीही लाजत लाजत कंगनाचा निषेध केला आहे. पण भाजपातील प्रखर राष्ट्रवादी अद्यापि गप्प का आहेत?"

"कंगनाबेनचे डोके हे बधीर झाले आहे, असे वरुण गांधी म्हणतात. कोणत्या कारणामुळे ते बधीर झाले ते एनसीबीचे वानखेडेच शोधू शकतील! पण मोदी सरकारचे डोकेही त्याच कारणाने बधीर झाले नसेल तर या देशद्रोहाबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार ते परत घेतील. वीरांचा, स्वातंत्र्याचा अपमान देश कधीच सहन करणार नाही!"

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in