Kangana Ranaut च्या अडचणी वाढल्या, पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने तिचा पासपोर्ट रिन्यू करून मिळावा यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. बॉम्बे हायकोर्टात या अभिनेत्रीने धाव घेतली आहे. आपल्या याचिकेत तिने असं म्हटलं आहे की वांद्रे पोलिसांनी माझ्या विरोधात घृणास्पद ट्विट आणि देशद्रोह प्रकरणी FIR दाखल केली आहे. त्यामुळे मला पासपोर्ट रिन्यू करून मिळत नाही. या प्रकरणी माझ्या बहिणीला म्हणजेच रंगोलीलाही आरोपी ठरवण्यात आलं आहे. मात्र मी एक अभिनेत्री आहे मला देशांतर्गत आणि विदेशांमध्ये काही प्रोफेशनल मिटिंग्जसाठी जावं लागतं. मला 15 जून ते ऑगस्ट या कालावधीत बुडापेस्ट या ठिकाणी जायचं आहे त्यामुळे पासपोर्ट रिन्यू करून मिळावा अशी मागणी याचिकेद्वारे कंगनाने केली आहे. तिच्या या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

मला एका सिनेमात मध्यवर्ती भूमिका मिळाली आहे या सिनेमाच्या शुटिंगसाठी मला बुडापेस्ट या ठिकाणी जायचं आहे मात्र पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी माझ्यावर लावण्या आलेल्या आरोपांमुळे पासपोर्टचं नुतनीकरण करण्यास नकार देत आहेत. ते नुतनीकरण मला करून मिळावं असंही कंगनाने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कंगनाच्या ‘धाकड’ सिनेमाच्या दुसऱ्या शेड्यूलचं शूटिंग बाकी आहे. यासाठी कंगनाला प्रवास करणं महत्वाचं असल्याचं या याचिकेत म्हंटलं आहे. तसंच कंगनाने आधीच शूटिंगसाठी कमिटमेंट केल्या आहेत. विदेशात प्रॉडक्शन हाऊसकडूनही सर्व तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे कंगनाचं तिथे पोहचणं महत्वाचं आहे असं म्हणतं पासपोर्ट रिन्यू करण्यात यावं अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

कंगनाने आपल्या याचिकेत हे देखील म्हटलं आहे की माझा पासपोर्टची मुदत सप्टेंबर 2021 ला संपणार आहे. त्यामुळेच मला माझा पासपोर्ट रिन्यू करायचा आहे. मात्र देशद्रोह केल्याचा आरोप करत माझ्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे त्यामुळे पासपोर्ट रिन्यू करून मिळत नाही असंही तिने म्हटलं आहे. देशद्रोह केल्याप्रकरणी जी FIR दाखल करण्यात आली आहे त्यामुळे कंगनाच्या अडचणी वाढल्या आहेत असं दिसतं आहे. हायकोर्टाने याबाबत अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाही. आज यावर सुनावणी होऊन निर्णय येण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

बंगाल निवडणुकांच्या ट्विट्सनंतर अभिनेत्री कंगना रणौतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंगना आणि तिची बहिण रंगोलीवर वांद्रे पोलिस ठाण्यात मुनव्वर अली सैय्यद यांनी गुन्हा दाखल केला होता. मुनव्वर बॉलिवूडमध्ये कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर आहेत. कंगना आणि रंगोली यांच्या काही वादग्रस्त ट्विट्सचा हवाला देऊन मुनव्वर यांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली बॉलिवूडची प्रतिमा मलीन कऱण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हटलं होतं. तसंच कंगना आणि तिची बहीण रंगोली जाणीवपूर्वक दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहेत असाही आरोप केला होता. ज्यानंतर कंगना आणि रंगोलीवर धार्मिक तेढ निर्माण करणं, जाणीवपूर्वक धार्मिक भावनां दुखावणंया आरोपांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वीच कंगनाने बंगाल निवडणूक निकालानंतरही काही वादग्रस्त ट्विट्स केली होती. ज्यानंतर ट्विटरने कंगनाचं ट्विटर अकाऊंटही सस्पेंड केलं. त्यापाठोपाठ आता तिला पासपोर्ट नूतनीकरणातही अडचणी येत आहेत. एकंदरीत काय तर तिने केलेले ट्विट्स तिच्या अडचणी वाढवत आहेत हेच चित्र आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT