'स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगनाला चांगल्या डॉक्टरांकडे दाखवण्याची गरज'

जाणून घ्या हे वक्तव्य नेमकं कुणी केलं आहे?
'स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगनाला चांगल्या डॉक्टरांकडे दाखवण्याची गरज'
कंगना रणौत फोटो सौजन्य- कंगना रणौत -फेसबुक पेज

अभिनेत्री कंगना रणौतने एका जाहीर कार्यक्रमात स्वातंत्र्याबाबत वक्तव्य करत असताना ते आपल्याला भीक म्हणून मिळालं असं म्हटलं आहे. त्यावरून बराच वाद निर्माण झाला आहे. आपल्याला 1947 जे स्वातंत्र्य मिळालं ती तर भीक होती. आपण खरे स्वतंत्र झालो ते 2014 ला असं वक्तव्य कंगनाने या कार्यक्रमात केलं होतं त्यावरून चांगलाच वाद रंगला आहे. आता याबाबत साहित्यिक उर्विश कोठारी यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. कंगनाला चांगल्या डॉक्टरांकडे दाखवण्याची गरज आहे असं त्यांनी आता म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत उर्विश कोठारी?

आझादी हा विषय सध्या पुन्हा चर्चेत आहे. याआधी तो कन्हैय्याकुमारमुळे चर्चेत आला होता. आता तो चर्चेत आला तो एका वक्तव्यामुळे. आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं? 99 वर्षांच्या लीझवर मिळालं? की भीक म्हणून मिळालं. आता युपीएससीच्या परीक्षेत प्रश्न आला तर आश्चर्य वाटायला नको की भारताला स्वातंत्र्य नेमकं कसं मिळालं? भीक म्हणून मिळालं? ९९ वर्षांच्या करारावर मिळालं? की कोणत्या इतर पर्यायाच्या आधारे? असंही विचारलं जाऊ शकतं.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कुणी म्हटलं होतं? हे येणाऱ्या पिढीला समजेल का? स्वातंत्र्य आपल्याला भीक म्हणून मिळालं असा इतिहास लिहिला गेला तर पुढची पिढी काय धडे घेणार? हे कुणी सांगितलं होतं? असा प्रश्न विचारायला जायला नको त्याऐवजी स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं असं म्हणणाऱ्यांना चांगल्या डॉक्टरांकडे दाखवलं नाही का? असा प्रश्न विचारला गेला पाहिजे.

अशा लोकांचे उपचार हे संबित पात्रांना विचारून करू नका. एखाद्या चांगल्या मनोविकार तज्ज्ञाकडे अशा लोकांना दाखवलं पाहिजे. जर कुणी पद्मश्री पुरस्कार मिळालेली व्यक्ती असं म्हणत असेल तर आपण त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे दाखवलं पाहिजे. काही लोकांना वाटतं की हे लक्ष विचलित करण्यासाठी होतं आहे. पण अशा लोकांचा दोष नाही. तुम्ही या लोकांकडून जीडीपी, अर्थव्यवस्था अशा विषयांवर भाष्य अपेक्षित करता का? असं असेल तर ती तुमची चूक आहे. बाभळीचं झाड लावलं तर त्याला आंबे कसे येतील?

तेव्हा लोकांनी अशा लोकांकडून अपेक्षाच ठेवू नये. देशाने तुमच्यासाठी काय केलं हे विचारू नका तुम्ही देशासाठी काय केलं ते विचारा असं केनडी म्हणाले. ते भारतात असते तर तेपण हेच म्हणाले असते की तुम्ही सरकारशी किती खरं बोलता ते लक्षात ठेवा,सरकार तुमच्याशी किती खोटं बोललं ते लक्षात ठेवू नका.' असं म्हणत उर्विश कोठारी यांनी कंगनाला टोला लगावला आहे.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेकदा काही वक्तव्यं करुन कंगनाने वाद ओढावून घेतल्याचं आतापर्यंत आपण पाहिलं आहे. आता देखील कंगनाने एक अशाच पद्धतीचं अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यावरुन सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. कंगनाने एका कार्यक्रमात असं वक्तव्य केलं आहे की, '1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.' असं वक्तव्य कंगनाने केलं. ज्यानंतर आता कंगनावर टीका होताना दिसते आहे. एवढंच नाही तर तिच्याविरोधात मुंबई आणि पुण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

कंगना रणौत
कंगना रणौत विरोधात पुण्यातल्या चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

कंगना नेमकं काय म्हणाली होती?

'सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो तर या लोकांना माहित होते की रक्त सांडावं लागेल. पण ते हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचं रक्त सांडू नये.. अर्थातच त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण तेव्हा जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.'

या कार्यक्रमात कंगना असंही म्हणाली की, 'काँग्रेसची सत्ता असताना मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जेव्हा मी राष्ट्रवाद, सैन्य सुधारणा आणि माझ्या संस्कृतीचा प्रचार करते तेव्हा लोक म्हणतात की, मी भाजपचा अजेंडा चालवत आहे. खरं तर हा मुद्दा भाजपचा अजेंडा का असावा.. हा तर देशाचा अजेंडा असला पाहिजे.'

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in