90 चं दशक गाजवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक करिश्मा कपूर. ती बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे.
बॉलिवूडपासून दूर असली, तरी करिश्मा कपूरचं सौंदर्य एखाद्या पंचवीशीतल्या तरूणीला लाजवेल असं आहे.
करिश्माचं वय 48 वर्ष आहे. या वयात तिला स्वतःला कसं फीट ठेवायचं हे चांगलंच माहीत आहे.
करिश्मा कपूर नुकतीच लॅक्मे फॅशन वीक 2023 मध्ये रॅम्प वॉक करताना दिसली.
करिश्माने प्रसिद्ध फॅशन डिझायनरने बनवलेला अतिशय ग्लॅमरस ड्रेस परिधान केला होता.
फ्रिल स्कर्टला प्लंजिंग नेकलाइन ब्लाउज जोडलेला होता. यासह त्यावर मॅचिंग कोट तिने कॅरी केला होता.
या स्टायलिश आउटफिटवर मिनिमम ज्वेलरी लूक, बांधलेले केस आणि न्यूड मेकअप पाहून सगळ्यांच्याच नजरा खिळल्या.
करिश्माला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही तिने तिचे सौंदर्य ज्या प्रकारे जपलं आहे.
करिश्माला 18 वर्षांची मुलगी समायरा आणि 13 वर्षांचा मुलगा कियान अशी दोन मुलं आहेत.