"ईडी, सीबीआयने किरीट सोमय्यांना फ्रेंचायझी दिली का?"

महाविकास आघाडीतील नेत्यांवर केलेल्या भ्रष्टाचाऱ्याच्या आरोपावरून काँग्रेसचा सवाल
भाजप नेते किरीट सोमय्या. (संग्रहित छायाचित्र)
भाजप नेते किरीट सोमय्या. (संग्रहित छायाचित्र)Twitter

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोध दुसऱ्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधल्यानंतर आता सवाल उपस्थित करत काँग्रेसने भाजपला प्रत्युत्तर दिलं.

किरीट सोमय्या आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानांवर काँग्रेसचे राज्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करून निशाणा साधला आहे. 'काँग्रेस नेत्यांचे भ्रष्टाचार काढणार या नवीन भविष्यवाणीआधी, ७२ तासात "माजी"चे "आजी" मंत्री होणार या चंद्रकांत पाटील यांच्या भविष्यवाणीचं काय झालं?', असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे.

'देशात आज कुठेच कोणाचा शपथविधी झालेला दिसत नाही. आम्ही दादांना शुभेच्छा कशा द्याव्यात?', असा टोलाही सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या. (संग्रहित छायाचित्र)
चंद्रकांत पाटील खरे मास्टरमांईड... सोमय्यांचा टूल म्हणून वापर; हसन मुश्रीफांचा पलटवार

'कोविडमुळे राज्यात तसेही नाटक सिनेमा बंद आहेत. त्यामुळे सोमय्या व पाटील यांचे हे फुकटचे मनोरंजन म्हणून जनता पाहत आहे. ईडी, सीबीआयने सोमय्यांना फ्रेंचायझी दिली का? तक्रारी करायच्या तर करा, पण चौकशीचे कामही भाजपाच करणार का? काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप करायचे असतील, तर फुसक्या लवंग्या नको दमदार करा! नौटंकीला जशास तसे उत्तर देऊ', असा इशारा सावंत यांनी भाजपला दिला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या. (संग्रहित छायाचित्र)
Kirit Somaiya: सोमय्या-हसन मुश्रीफ आमनेसामने, आरोपांचा धुरळा; नेमकं प्रकरण काय?

महाविकास आघाडीचे नेते सोमय्यांच्या रडारवर

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले जात आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारची टीम ११ म्हणत काही मंत्र्यांची नावं घोषित केली होती. या मंत्र्यांनी केलेले भ्रष्ट्राचार उघडकीस आणण्याचा इशारा सोमय्या यांनी दिलेला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in