43 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या शेअरचा पडला होता विसर, आज किंमत 1448 कोटी रुपये!

PI Industries Shares Rs 1448 crore: एका व्यक्तीने 43 वर्षापूर्वी खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत आता तब्बल 1448 कोटी एवढी झाली आहे.
43 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या शेअरचा पडला होता विसर,  आज किंमत 1448 कोटी रुपये!
PI Industries Shares Rs 1448 crore(प्रातिनिधिक फोटो)

कोची: तुम्ही ही म्हण ऐकली असेलच की, 'भगवान जब भी देता है तो छप्पर फाड के...' केरळमधील कोची येथे राहणाऱ्या बाबू जॉर्ज वलावी यांच्यासोबत देखील असेच काहीसे घडले आहे. बाबू जॉर्ज यांनी 43 वर्षांपूर्वी एका कंपनीचे 3500 शेअर्स खरेदी केले होते. ज्याबाबत ते मधल्या काही वर्षात पूर्णपणे विसरून गेले होते. पण अलीकडेच जेव्हा त्यांनी हे शेअर्स पाहिलं तेव्हा त्यांचा आश्चर्याचा प्रचंड मोठा धक्का बसला होता. कारण त्या शेअरचे मूल्य तब्बल 1448 कोटी रुपयांवर जाऊन पोहचले आहे.

बाबू जॉर्ज यांचा दावा आहे की, ते कंपनीच्या शेअर्सचा खरे मालक आहेत. पण कंपनी त्यांना रक्कम देण्यास नकार देत आहे. आता ते सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे गेले आहेत आणि त्यांना आशा आहे की, त्यांना सेबीकडून नक्कीच न्याय मिळेल.

रक्कम एवढी मोठी की कंपनीही हैराण

बाबू जॉर्ज आणि त्यांचे कुटुंबीय हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत की, तेच कंपनीच्या शेअर्सचे खरे मालक आहेत. कारण रक्कम (1488 कोटी) जास्त आहे. त्यामुळे कंपनी त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे.

काय आहे प्रकरण?

वृत्तसंस्था IANS आणि इतर अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोचीस्थित बाबू जॉर्ज वालावी आणि त्याच्या चार नातेवाईकांनी 1978 साली मेवाड ऑइल अँड जनरल मिल्स लिमिटेडचे ​​(Mewar Oil and General Mills Ltd) 3500 शेअर्स खरेदी केले होते. त्यावेळी ती उदयपूरमधील एक अनलिस्टेड कंपनी होती.

आता 74 वर्षांचे झालेले बाबू या कंपनीचे वितरक होते. त्यावेळी त्यांनी 3500 शेअर्स खरेदी केले होते. त्यानुसार ते कंपनीचे 2.8% भागधारक बनले होते. कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष पीपी सिंघल आणि बाबू हे मित्र होते. कंपनी अनलिस्टेड होती आणि कोणताही डिव्हिडेंड देत नव्हती, यामुळे हे कुटुंब काही वर्षांनंतर त्यांच्या गुंतवणूकीबद्दल विसरुन गेले होते.

2015 मध्ये, जेव्हा बाबू हे काही जुने कागदपत्रे पाहत होते, तेव्हा त्यांना आठवले की त्यांनी उदयपूरमधील एका कंपनीत गुंतवणूक केली होती. बाबू यांच्याकडे मूळ शेअर खरेदी केल्याचे कागदपत्र होते आणि त्यांनी शेअर्सबद्दल अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा बाबू यांना कळले कीMewar Oil and General Mills Ltd ने आपले नाव बदलून PI Industries केले आहे आणि ती एक लिस्टेड कंपनी बनली आहे.

पीआय इंडस्ट्रीजने आपला व्यवसाय रसायने आणि कीटकनाशकांच्या निर्मितीमध्ये वाढवला आणि आता त्याचे बाजार भांडवल सुमारे 50,000 कोटी रुपये आहे.

बाबू यांनी आपले शेअर्स Demat Account रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला आणि एका एजन्सीशी संपर्क साधला. एजन्सीने बाबू यांना थेट कंपनीशी संपर्क करण्यास सांगितले. कंपनीशी थेट संपर्क साधला असता बाबू आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. खरं तर, कंपनीने बाबू त्यात कोणतेही भागीदार असल्याचे मान्य करण्यास नकार दिला.

कंपनीचे म्हणणे आहे की, वर्ष 1989 मध्ये त्यांचे शेअर्स दुसऱ्या कुणाला विकले. बाबू यांचा आरोप आहे की, PI Industries ने बेकायदेशीरपणे डुप्लिकेट शेअर्सचा वापर करून त्यांचे शेअर्स दुसऱ्या कोणाला तरी विकले.

जेव्हा बाबू आणि त्यांच्या नातेवाईकांनी शेअर्स खरेदी केले होते तेव्हा त्यांना कंपनीमध्ये 2.8 टक्के हिस्सा मिळाला होता आणि त्यानुसार कुटुंबाची मालकी आता 42.28 लाख शेअर्समध्ये बदलली गेली आहे. बाबू हे जाणून आश्चर्यचकित झाले की त्यांच्याकडे सध्या पीआय इंडस्ट्रीजमध्ये असलेले 42.8 लाख शेअर्स आहेत आणि त्यांच्या शेअर बाजारातील किंमत 1448 कोटी रुपयांवर गेली आहे.

PI Industries Shares Rs 1448 crore
शेअर बाजाराची ऐतिहासिक मुसंडी! निर्देशांक पहिल्यांदाच ६० हजारांच्या पार

कंपनीकडून मध्यस्थीचा प्रयत्न

वर्ष 2016 मध्ये PI Industries ने बाबू यांना मध्यस्थीसाठी दिल्लीला बोलावले होते. पण बाबू यांनी यासाठी नकार दिला. यानंतर, कंपनीने बाबूच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी केरळमध्ये दोन उच्च अधिकारी पाठवले होते. यानंतर कंपनीने मान्य केले की बाबू सोबत असलेली कागदपत्रे खरी आहेत पण नंतर त्यांनी त्यावर काहीही निर्णय घेतला नाही. आता बाबूंनी हे प्रकरण सेबीकडे नेले आहे. त्यामुळे आता सेबीला त्यावर निर्णय घ्यायचा आहे.

Related Stories

No stories found.