कोल्हापूर : मोक्काअंतर्गत कारवाईची धमकी, १० लाखांची लाच स्विकारताना दोन कॉन्स्टेबल जाळ्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जुन्या स्पोर्ट्स बाईकची विक्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन मोक्काअंतर्गत कारवाईची धमकी देत लाच मागणाऱ्या दोन कॉन्स्टेबल्सना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. विजय कारंडे आणि किरण गावडे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं असून १० लाखांची लाच स्विकारताना त्यांना अटक करण्यात आली आहे.

अँटी करप्शनचे अधिकारी कारवाई करत असतानाही हे दोन आरोपी कॉन्स्टेबल पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. यानंतर या दोघांना पुन्हा पकडून चोप देण्यात आला. शाहुपुरी पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे कोल्हापूर पोलीस दलाची मोठी बदनामी झाली आहे.

भाजीवाल्यांकडून पैसे घेतानाचा Video व्हायरल, माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोल्हापूरच्या प्रतिभा नगर येथे राहणारे वकील दत्तात्रेय जाधव यांचा मुलगा संदेश हा घराजवळच स्वतःचं गॅरेज चालवतो. संदेशचा स्पोर्ट्स बाईक विक्रीचाही व्यवसाय आहे. नुकतच त्यांन पनवेल इथून एक जुनी स्पोर्ट्स बाइक खरेदी केली होती.स्क्रॅप करण्यासाठी आणलेली ही दुचाकी त्यान गॅरेजमध्ये लावली होती.दरम्यान याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील हवालदार विजय कारंडे आणि पोलीस नाईक किरण गावडे या दोघांना माहिती मिळाली. त्यांनी १८ जानेवारी रोजी संदेश जाधव याला उचलून चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

चोरीच्या दुचाकी वापरून त्याची विक्री करत असल्याचा आरोप त्याच्यावर केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून खोटे तक्रारदार उभा करून मोका अंतर्गत कारवाई करण्याची धमकी या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांनी दिली.

ADVERTISEMENT

यानंतर १८ जानेवारीला सायंकाळी संदेशला सोडण्यात आल्यानंतर १९ जानेवारीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या दरम्यान संदेशचे वडील ॲड.दत्तात्रय जाधव हे या पोलीस कर्मचाऱ्यांना भेटले. मुलाला गुन्हे दाखल करण्यापासून आणि मोक्कांतर्गत कारवाईपासून वाचवायच असेल तर २५ लाख रुपये द्यावे लागतील असं कारंडे आणि गावडे यांनी सांगितलं. ॲड.जाधव यांनी इतकी रक्कम आपल्याकडं नसल्याचं सांगितलं. मात्र कारंडे आणि गावडे हे दोघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळ तडजोडी अंती प्रथम १० लाख आणि उर्वरित रक्कम नंतर देण्याचं निश्चित झालं.

ADVERTISEMENT

या दरम्यान ॲड. दत्तात्रय जाधव हे २० जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात गेले. पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याकडे त्यांनी तक्रार दिली. कारंडे आणि गावडे या दोघा पोलिसांनी अॅड.जाधव यांना पोलीस मुख्यालय परिसरातील अलंकार हॉल इथं बोलावलं होतं. तिथं या दोघांनी २५ लाख लाचेची मागणी केल्याचं आणि ॲड.जाधव यांनी इतकी रक्कम देणे शक्य नाही, एक दिवसाची वेळ द्या; बँकेतून पैसे काढतो असं सांगितल्याबाबत व्हाईस रेकॉर्डरमध्ये टिपण्यात आलं. यानंतर अँटी करप्शनने या दोन्ही कॉन्स्टेबलला रंगेहाथ पकडण्याचा प्लान आखला.

शुक्रवारी सकाळी लाचेची लाचेची रक्कम घेऊन ॲड. जाधव आणि त्यांचा मुलगा संदेश हे दोघे जण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात गेले. जाधव यांच्या गाडीत बसून विजय कारंडे आणि किरण गावडे या दोघांनी १० लाखाची रक्कम असलेली बॅग स्वीकारली. त्यावेळी ॲड. जाधव यांनी इशारा करताच सापळा रचलेल्या अँटी करप्शनच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून दोघा लाचखोरांना पकडलं. मात्र दोघांनी कर्मचाऱ्यांना हिसडा मारून पलायन केलं. पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी या दोघांचा पाठलाग केला.

पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरातील शाहूवाडी उपविभागीय कार्यालयाच्या आवारात या दोघांनाही पकडल. संतप्त झालेल्या पोलीस उपअधिक्षकांनी या दोघांनाही पोलिसी खाक्या दाखवला. त्यांना ताब्यात घेऊन अँटी करप्शनच्या कार्यालयात आणलं. दरम्यान सापळा कारवाई यशस्वी करण्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात वेशांतर करून ७ जणांच पथक तैनात केल्याचं पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितल.

हा सर्व प्रकार पोलीस अधीक्षक कार्यालयातून अनेक कर्मचाऱ्यांनी पाहिला. या घटनेनंतर तात्काळ विजय कारंडे आणि किरण गावडे यांच्या घरावर अँटी करप्शन विभागाच्या पथकानं छापे टाकले आहेत. त्यातून देखील काही वस्तू पथकाच्या हाती लागल्याच सांगण्यात आल. दरम्यान हवालदार कारंडे यांच्या मालकीची चार चाकीही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मयूर देसाई,नवनाथ कदम,विकास माने, सूनील घोसाळकर,रुपेश माने,चालक सुरज अपराध या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT