'मनिष भानुशाली-KP गोसावींना 2 ऑक्टोबरपर्यंत ओळखतच नव्हतो', समीर वानखेडेंचं नवं स्पष्टीकरण

KP Gosavi Manish Bhanushali were known to NCB said Sameer Wankhede: भानुशाली किंवा गोसावी यांना आपण 2 ऑक्टोबरपर्यंत ओळखतच नव्हतो असं स्पष्टीकरण आता समीर वानखेडेंनी दिलंय.
'मनिष भानुशाली-KP गोसावींना 2 ऑक्टोबरपर्यंत ओळखतच नव्हतो', समीर वानखेडेंचं नवं स्पष्टीकरण
KP Gosavi Manish Bhanushali were known to NCB before October 2 NCB sameer wankhede responds to Nawab Malik

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला मुंबई ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आल्यापासून नवनव्या गोष्टी सातत्याने समोर येत आहे. तसेच दुसरीकडे NCB ने केलेली ही कारवाई पूर्णत: बनावट असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक सातत्याने करत आहेत. त्यातही केपी गोसावी आणि मनिष भानुशाली यांच्याबाबत मलिक यांच्याकडून सातत्याने NCB ला प्रश्न विचारले जात आहेत. ज्याबाबत आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede)यांनी आता नवं स्पष्टीकरण दिलं आहे.

समीर वानखेडे यांनी याबाबत अधिकृतरित्या असं सांगितलं आहे की, 2 ऑक्टोबरपर्यंत NCB चे कुणीही अधिकारी हे मनिष भानुशाली आणि केपी गोसावी यांना ओळखत नव्हते. त्यामुळे नवाब मलिक यांच्याकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाला एकप्रकारे वानखेडे यांनी उत्तर दिलेलं आहे.

पाहा समीर वानखडे यांनी नेमकी काय माहिती दिली:

अटकेत असलेल्या आरोपींनी दिलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे, एनसीबी मुंबईने काल (9 ऑक्टोबर) च्या रात्री छापेमारी सुरू केली.

एनसीबी मुंबईच्या पथकाने वेस्टिन गेट, ओबेरॉय गार्डन सिटी, इंटरनॅशनल बिझनेस पार्क, यशोधम, गोरेगाव येथे पाळत ठेवली होती. त्यानुसार 09 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा कोकेनसह ओकेरो ओझमा नावाच्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली.

या गुन्ह्यातील ही विसावी अटक आणि परदेशी नागरिकांची दुसरी अटक आहे. एनसीबी मुंबई सर्व आरोपींच्या चौकशीच्या आधारे या प्रकरणाचे परदेशी संबंध शोधण्याचा प्रयत्न केले जात आहे. पुढील तपास प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणी समीर वानखडे यांनी आणखी स्पष्टीकरण दिलं आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, 'या संपूर्ण ऑपरेशनमध्ये एकूण या 9 लोकं होते ज्यांचा समावेश स्वतंत्र साक्षदार म्हणून करण्यात आला होता. ज्यामध्ये मनिष भानुशाली आणि केपी गोसावी हे देखील होते. पण 2 ऑक्टोबर रोजी ही कारवाई होण्यापूर्वी मनिष भानुशाली किंवा KP गोसावी यांना आपण ओळखत नव्हतो.' असं भानुशाली यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर आता नवाब मलिक याप्रकरणी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आणखी एका आरोपीला अटक

दुसरीकडे मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी आता आणखी एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील ही 20वी अटक आहे. याबाबतची माहिती स्वत: एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.

KP Gosavi Manish Bhanushali were known to NCB before October 2 NCB sameer wankhede responds to Nawab Malik
किरण गोसावीचा आणखी एक प्रताप आला समोर! पालघरमधील दोन तरुणांना दीड लाखांना लुबाडलं

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री उशिरा गोरेगावसह मुंबई उपनगरात अनेक ठिकाणे छापे टाकले त्यावेळी त्यांनी ड्रग्स केसप्रकरणीच शुक्रवारी रात्री सांताक्रूझ परिसरातून शिवराज रामदास नावाच्या आणखी एका व्यक्तीला अटक केली होती. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह या प्रकरणात आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.