'मंत्री बाहेर फिरतोय अन्...'; खासदार संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट
शिवसेनेचे खासदार संजय राऊत... ANI

'मंत्री बाहेर फिरतोय अन्...'; खासदार संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट

लखीमपूर खीरी हिंसाचारानंतर प्रियंका गांधींना अटक : दिल्लीत संजय राऊत-राहुल गांधी यांच्यात चर्चा

उत्तर प्रदेशात घडलेल्या लखीमपूर खीरी येथील घटनेवरून विरोधकांनी योगी सरकारबरोबरच केंद्रातील मोदी सरकारलाही धारेवर धरलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधकांनी घटनेची निंदा केली. या प्रकरणात पीडितांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आलं आहे. या घडामोडीनंतर आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली.

लखीमपूर खीरी येथील हिंसाचारावरून भाजपवर टीकेचे बाण डागणाऱ्या संजय राऊतांनी आज अचानक काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली. राहुल गांधी यांच्या भेटीला जाण्यापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत...
लखीमपूर खीरी : शेतकऱ्यांना गाडीने उडवतानाचा 'तो' व्हिडीओ आला समोर

त्यावेळी ते म्हणाले, 'प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची भेट घेणं आवश्यक आहे. जर कायदा सगळ्यांसाठी समान आहे, तर प्रियंका गांधी तुरूंगात आणि मंत्री बाहेर का फिरत आहेत?', अस सवाल त्यांनी उपस्थि केला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत...
Sanjay Raut म्हणाले, मोदीजी आम्ही तुमचं रडणं खूप सहन केलं, आता...

राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर राऊत परत निघाले. त्यावेळी माध्यमांनी लखीमपूर खीरीबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ लखीमपूर खीरीला भेट देणार आहे का?, या प्रश्नावर राऊत म्हणाले, 'या मुद्द्यावर चर्चा झाली आहे.'

शिवसेनेचे खासदार संजय राऊत...
'उत्तर प्रदेशात जालियनवाला बागसारखी परिस्थिती', लखीमपूर घटनेवर शरद पवार यांची प्रतिक्रिया

लखीमपूर खीरी हिंसाचारानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी पीडितांची भेट घेण्यासाठी जाणार होत्या. मात्र, रस्त्यातच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलं. प्रियंका गांधी यांना ज्याठिकाणी ठेवण्यात आलं आहे. तिथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू आहे. मात्र, आता विरोधकांचं शिष्टमंडळ लखीमपूर खीरीला भेट देण्याची शक्यता वाढल्यानं मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची डोकेदुखी वाढणार आहे.

Related Stories

No stories found.