'मोदीजी हा व्हीडिओ पाहिलात का?','तो' व्हायरल VIDEO दाखवत प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
lakhimpur violence congress priyanka gandhi viral video farmer death pm narendra modi uttar pradesh(फोटो सौजन्य: Twiiter/व्हीडीओ ग्रॅब)

'मोदीजी हा व्हीडिओ पाहिलात का?','तो' व्हायरल VIDEO दाखवत प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल

Lakhimpur violence: लखीमपूर हिंसाचाराचे वेगवेगळे व्हीडिओ आता समोर येत आहेत. याचाच एक व्हीडिओ प्रियंका गांधी यांनी थेट PM मोदींना दाखवला आहे.

नवी दिल्ली: उत्तरप्रदेशमधील लखीमपूर-खेरी येथे झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या लखीमपूरसाठी रवाना झाल्या होत्या. पण तेथील स्थानिक पोलिसांनी त्यांना रोखलं आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवलं. 28 तास उलटून गेलेले असतानाही प्रियंका गांधी यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. याच वेळी प्रियंका गांधी यांनी एक व्हायरल व्हीडिओ दाखवत पंतप्रधान मोदींना काही सवाल केले आहेत.

दरम्यान, आज आपच्या संजय सिंह यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हीडिओ शेअर केला ज्यामध्ये शेतकऱ्यांची निदर्शनं सुरु असतानाच अचानक पाठीमागून एक गाडी येते. ही गाडी थेट शेतकऱ्यांना चिरडत पुढे निघून गेली. ज्यानंतर येथील वातावरण प्रचंड तापलं आणि हिंसाचार उसळला. हाच व्हीडिओ आता प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट पंतप्रधान मोदींना दाखवला आहे.

'मोदीजी तुम्ही हा व्हीडिओ पाहिलात का?'

नजर कैदेत असलेल्या प्रियांका गांधी आपल्या मोबाइलवरुन शेतकऱ्यांना चिरडण्याचा व्हायरल व्हीडिओ थेट पंतप्रधान मोदी यांना दाखवत अनेक प्रश्न उपस्थित केले. पाहा यावेळी प्रियंका गांधी नेमकं काय म्हणाल्या.

'मोदीजी नमस्कार... मी ऐकले आहे की, आज तुम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी लखनौला येत आहात. पण त्याआदी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का? ज्यात तुमच्या सरकारमधील मंत्र्याचा मुलगा आपल्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडताना दिसत आहे. व्हीडिओ पाहा आणि देशाला सांगा की, या मंत्र्याला बडतर्फ का करण्यात आले नाही? तसंच मंत्र्याच्या मुलाला अटक का करण्यात आली नाही?

तुम्ही माझ्यासारख्या विरोधी पक्षातील नेत्यांना कोणत्याही आदेश किंवा एफआयआरशिवाय कोठडीत डांबून ठेवलं आहे. त्यामुळे मला हे जाणून घ्यायचे आहे की शेतकऱ्यांना चिरडणारा माणूस अद्यापही मुक्त का आहे?'

'आज, जेव्हा तुम्ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात बसला आहात, तेव्हा जरा एक गोष्ट लक्षात ठेवा की, आपल्याला स्वातंत्र्य कोणी दिले. या शेतकऱ्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आहे. आजही शेतकऱ्यांचे पुत्र सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत. शेतकरी अनेक महिन्यांपासून त्रास सहन करत आहेत. आपला आवाज उठवत आहेत. पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. मी तुम्हाला आग्रह करते की तुम्ही लखीमपूरला या. या अन्नदात्याची जो देशाचा आत्मा आहे त्याच्या वेदना समजून घ्या. त्यांचे रक्षण करणे तुमचे कर्तव्य आहे... जय हिंद, जय किसान.' असं प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या.प्रियांका यांनी मोबाईलद्वारे एक व्हिडीओ दाखवला आहे. ज्यात एक कार घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांना अक्षरश: चिरडत पुढे जात आहे. त्यानंतर लखीमपूर-खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. या व्हिडीओमध्ये शेतकरी एका कारला धडकून जमिनीवर पडताना दिसत आहेत. तर इतर शेतकरी वाहनाच्या पुढील भागापासून दूर जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांना धडक देणाऱ्या एसयूव्हीच्या मागे सायरन वाजत असलेली आणखी एक कार यावेळी दिसत आहे.

प्रियांका यांनी मोबाईलद्वारे एक व्हिडीओ दाखवला आहे. ज्यात एक कार घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांना अक्षरश: चिरडत पुढे जात आहे. त्यानंतर लखीमपूर-खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला.

या व्हिडीओमध्ये शेतकरी एका कारला धडकून जमिनीवर पडताना दिसत आहेत. तर इतर शेतकरी वाहनाच्या पुढील भागापासून दूर जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांना धडक देणाऱ्या एसयूव्हीच्या मागे सायरन वाजत असलेली आणखी एक कार यावेळी दिसत आहे.

lakhimpur violence congress priyanka gandhi viral video farmer death pm narendra modi uttar pradesh
लखीमपूर खीरी : शेतकऱ्यांना गाडीने उडवतानाचा 'तो' व्हिडीओ आला समोर

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यावरुन मोदी सरकार आणि उत्तरप्रदेशमधील योगी सरकारवर प्रचंड टीका केली जात आहे. अनेकांचा दावा आहे की, हा व्हीडिओ लखीमपूर येथीलच आहे. लखीमपूर खेरी येथील तिकोनिया भागात शेतकऱ्यांचा एक गट हा केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्याच्या निषेध करण्यासाठी एकत्र जमा झाले होते. मिश्रा यांच्या अलीकडील भाषणामुळे शेतकरी संतप्त झाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in