Big News : ठाण्यात चेंबूरसारखीच दुर्घटना, दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

मोठ्या प्रमाणावर पावसामुळे कोसळली दरड
Big News : ठाण्यात चेंबूरसारखीच दुर्घटना, दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने जोर धरला आहे. ठाणे महापालिका हद्दीतील कळवा पूर्व या ठिकाणी घोळाई नगर भागात चार घरांवर दरड कोसळली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे. या दुर्घटनेत चार घरांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. तर काही जणांना सोडवण्यात आलं आहे.

कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दुर्गा चाळ येथील घरांवर दरड कोसळल्याने चार घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यामुळे शेजाऱ्यांनी तातडीने चार नागरिकांना बाहेर काढले, तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता असल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे. दुर्गा चाळ, घोलाई नगर, चर्च रोड, कळवा पूर्व येथे घरांवर दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली एकूण सात जण अडकले होते. तर पाच जणांना बाहेर काढण्यात आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता अशी माहिती कळवा पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

ठाण्यातल्या कळवा भागत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरांवर दरड कोसळल्याने अचानक मोठा आवाज आला. हा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूचे नागरिक घराबाहेर आले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. चार घरांवर दरड कोसळल्याने ती घरं उद्ध्वस्त झाली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढलं. मात्र, अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत काही लोकांना ढिगाऱ्याखालून सुखरुप काढलं बाहेर आहे. पण आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला आहे

या घटनेनंतर प्रीती यादव (पाच वर्षे) अचल यादव (18 वर्ष) यांना यशस्वीरित्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे आणि त्यांना ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर या दुर्घटनेत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यामंध्ये प्रभू सुदाम यादव (45 वर्षे) विधवतीदेवी प्रभू यादव (40 वर्षे) रविकिसन यादव (12 वर्ष) सिमरन यादव (10 वर्षे) संध्या यादव (3 वर्ष) यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in