CDS Bipin Rawat Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या आधीचे क्षण कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल

CDS रावत यांच्यासह १३ जणांचा दुर्घटनेत मृत्यू
CDS Bipin Rawat Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या आधीचे क्षण कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल
स्क्रिनग्रॅब - ANI Video

भारताचे प्रथम चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन राव यांचा त्यांच्या पत्नीसह हेलिकॉप्टर दुर्घटनेत अपघाती मृत्यू झाला. या दुर्घटनेत जनरल बिपीन रावत यांच्यासोबत असलेल्या इतर ११ सहकारी सदस्यांचंही निधन झालं. तामिळनाडूच्या कुन्नुर भागात जनरल रावत यांचं Mi-17V5 हे हेलिकॉप्टर कोसळलं त्याआधीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.

"मी सर्वात आधी एक जोरदार आवाज ऐकला, यानंतर मी जेव्हा बाहेर येऊन काय झालं हे पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा हेलिकॉप्टर झाडात कोसळल्याचं मी पाहिलं", अशी माहिती स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. हेलिकॉप्टर झाडात कोसळल्यानंतर एक जोरदार आगीचा गोळा बाहेर आला. ज्यानंतर मी दोन-तीन जणांना बाहेर पडताना पाहिलं, ते पूर्णपणे भाजलेले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

ANI या वृत्तसंस्थेने जनरल रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळण्याआधी हवेत कसं हेलकावे खात होतं, याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात काही स्थानिक लोकं जमा असलेली दिसत असून अवघ्या काही सेकंदात हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे.

CDS Bipin Rawat Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या आधीचे क्षण कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल
हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावतांचा मृत्यू, घटनास्थळावरील Exclusive फोटो

या दुर्घटनेत १३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. ज्यात CDS जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडीअर एल.एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरविंदर सिंह, विंग कमांडर पी.एस.चौहान, स्क्वॉर्डन लिडर के.सिंग, जे.डब्ल्यू.ओ. दास, जे.डब्ल्यू.ओ प्रदीप ए, हलावदार सतपाल, नाईक गुरसेवक सिंग, नाईक जितेंदर, लेफ्टनंट विवेक आणि लेफ्टनंट तेजा यांचा समावेश आहे.

CDS Bipin Rawat Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या आधीचे क्षण कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल
History of Air Crashes in India: CDS बिपीन रावतच नव्हे तर 'या' राजकीय नेत्यांनाही विमान अपघातामुळे आपण गमावलंय!

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in