Priya Berde : राष्ट्रवादी सोडली, भाजपच्या ‘कमळासोबत’ पुढील प्रवास…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Actress Priya Berde joined BJP :

नाशिक : अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) राम-राम करुन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये भाजप (BJP) प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने भाजपमध्ये मोठ्या संख्येवर पक्षप्रवेश पार पडले. यावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीमध्ये भाजपत प्रवेश केला. (Actress Priya Berde left ncp and joined bjp)

प्रिया बेर्डे यांनी ७ जुलै २०२० ला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता. महिला कलाकार, लोक कलावंत, तंत्रज्ञ यांच्यासाठी काम करण्याचा मानस असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या कार्याने प्रभावित होऊन या पक्षाची निवड केल्याचं त्या म्हणाल्या होत्या. पण अवघ्या दोन वर्षात त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपात प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Congress : महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या; थोरातांचं नाव गायब

दरम्यान, प्रिया बेर्डे यांनी भाजपची निवड का केली? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. प्रिया बेर्डे यांच्यासह आणखी काही इतर कलाकारांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यात अभिनेता गिरीश परदेशी, दिग्दर्शक मधुरा जोशी, विद्या पोकळे, मनिषा मुंडे, वेदांत महाजन, दत्तात्रय जाधव यांच्यासह आणखी काही दिग्गज कलाकारांनी आज भाजप पक्षात प्रवेश केला.

ADVERTISEMENT

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्मृतीदिनी बेर्डे कुटुंबियांनी केली मोठी घोषणा, लक्ष्या मामाचं स्वप्न करणार पूर्ण

ADVERTISEMENT

प्रिया बेर्डे कोण आहेत? (Who is Priya Berde)

प्रिया बेर्डे या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. तसंच दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या त्या पत्नी आहेत. मराठीत ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे. तर ‘बेटा’, ‘हम आपके है कौन’ अशा या हिंदी चित्रपटांतही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीतून राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. कोरोना काळात प्रिया बेर्डे यांनी अनेक कलाकारांना मदतीचा हात दिला होता. सिनेसृष्टीतील कलाकारांना केलेल्या मदतीमुळे प्रिया बेर्डे त्यावेळी चर्चेतही आल्या होत्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT