Live Assembly Elections Result News 2022 | Goa - Mumbaitak.in
Live Assembly Elections Result News 2022 | Goa - Mumbaitak.in(फोटो सौजन्य: India Today)

Goa Election Result 2022 LIVE Updates: फडणवीसांची मोठी घोषणा.. 'मगोप'ने भाजपला पाठिंब्याचं पत्रच दिलं!

Goa Election Result 2022 LIVE Updates: गोवा निवडणुकीत कोण मारणार बाजी, गोवेकरांचा कौल कुणाला? जाणून घ्या गोवा विधानसभा निकालाचे सविस्तर अपडेट.

गोव्यात भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप हे बहुमताच्या अगदी जवळ पोहचले आहेत. त्यामुळे भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आता सत्तास्थापनेचा दावाही करणार आहे.

गोवा आणि पाचही राज्यातील LIVE UPDATE

'मी या निकालाने खूप नाराज आहे. पणजी आणि ताळगाव येथील भाजप पक्ष.. विशेषत: कार्यकर्त्यांनी आम्हाला अजिबात पाठिंबा दिला नाही. ताळगावमध्ये तर भाजपची महिला अध्यक्ष ही स्वत: मतदानाच्या दिवशी काँग्रेसच्या बुथवर बसली होती. असंच पणजीमध्ये देखील घडलं. त्यामुळे मी जो पराभव केला आहे तो काँग्रेस आणि भाजप या दोघांचाही पराभव केला आहे. आजचा विजय हा फक्त माझ्या कार्यकर्त्यांमुळे झाला आहे. मी कोणाला पाठिंबा देणार हे नंतर सांगेन.' अशी प्रतिक्रिया बाबूश मोन्सेरात यांनी दिली आहे. बाबूश यांच्या या विधानाने मात्र भाजपला मोठा धक्का बसला आहे.

भाजपचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या अपक्ष निवडणूक लढवणारे उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकर हे मांद्रेम मतदारसंघातून आघाडीवर 

गोव्यात काँग्रेसने पहिल्या कलांमध्ये गाठला बहुमताचा आकडा, भाजपला धक्का, पहिल्या काही कलांमधील आकडेवारी: काँग्रेस - 20, भाजप: 16 टीएमसी: 4 

अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पणजी मतदारसंघाचा निकाल अखेर हाती आला आहे. या निवडणुकीत अपक्ष उत्पल पर्रिकर यांचा पराभव तर भाजपचे बाबूश मोन्सेरात यांचा विजय

पणजीत उत्पल पर्रिकर आणि बाबूश मोन्सरात यांच्यात अटीतटीची लढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

वाळपई मतदारसंघात भाजपचे विश्वजीत राणेंना 11487 मतं मिळाली आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा नोटाला अधिक मतं मिळाली आहेत. इथे शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त १६१ आणि नोटाला ३५४ मतं मिळाली आहेत.

मुख्यमंत्री पदाची आशा नाही. पक्ष जी कामगिरी सोपावेल ती पार पाडली जाईल. असं वक्तव्य भाजपचे उमेदवार विश्वजीत राणे यांनी केलं आहे.

MGP सध्या गोव्यात किंगमेकर आहे. त्यामुळे जो पक्ष आम्हाला मुख्यमंत्री पद द्यायला तयार असेल त्याच्यासोबत आम्ही जाऊ. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे उमेदवार नरेश सावल यांनी दिली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पुन्हा एकदा आघाडीवर तीनशेहून अधिक मतांची आघाडी

गोव्यातील बाबूश मोन्सेरात (पणजी), विजय सरदेसाई हे गोवा फॉरवर्ड पक्षाचे फातोर्डामधून आघाडीवर

याशिवाय विश्वजीत राणे आणि त्यांची दिव्या राणे या देखील आपल्या मतदारसंघातून आघाडीवर. दिव्या राणे या पर्ये (Poriem) तर विश्वजीत राणे वाळपई (Valpoi) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पिछाडीवर, मात्र कलांमध्ये भाजपला 19 जागांवर आघाडी

गोव्यातील चित्र पुन्हा बदललं, भाजप 18 तर काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर

भाजपचे बाबूश मोन्सेरात आणि जेनिफर मोन्सेरात हे दोघेही आपआपल्या मतदारसंघातून आघाडीवर, बाबूश हे पणजी तर जेनिफर या ताळगाव मतदारासंघातून निवडणूक लढवत आहेत.

- पहिल्या कलांमध्ये बाबूश मोन्सेरात हे 300 मतांनी आघाडीवर, पोस्टल बॅलेटमध्ये उत्पल पर्रिकर हे आघाडीवर होते. पण आता ते काहीसे मागे पडले आहेत.

मी कॉंग्रेस सोबत कधीच नव्हतो, भाजपने माझा विश्वासघात केला आहे. राज्याला फायदा होईल अशीच भूमिका घेईन: लक्ष्मीकांत पार्सेकर

दक्षिण गोवा: गोवा विधानसभा मतमोजणीची तयारी पूर्ण, अवघ्या काही मिनिटात सुरु होणार मतमोजणी

भाजपला 8 जागांवर आघाडी तर काँग्रेस आघाडीला 6 जागांवर पुढे

निवडणुकीच्या निकालाआधी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साखळीतील दत्त मंदिरात घेतलं सपत्नीक दर्शन 

भाजपच्या विरोधात निवडणूक लढवणारे उत्पल पर्रिकर पोहचले मतमोजणी केंद्रावर

Key Events

अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पणजी मतदारसंघाचा निकाल अखेर हाती आला आहे. या निवडणुकीत अपक्ष उत्पल पर्रिकर यांचा पराभव तर भाजपचे बाबूश मोन्सेरात यांचा विजय

पणजीत उत्पल पर्रिकर आणि बाबूश मोन्सरात यांच्यात अटीतटीची लढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

वाळपई मतदारसंघात भाजपचे विश्वजीत राणेंना 11487 मतं मिळाली आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा नोटाला अधिक मतं मिळाली आहेत. इथे शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त १६१ आणि नोटाला ३५४ मतं मिळाली आहेत.

मुख्यमंत्री पदाची आशा नाही. पक्ष जी कामगिरी सोपावेल ती पार पाडली जाईल. असं वक्तव्य भाजपचे उमेदवार विश्वजीत राणे यांनी केलं आहे.

MGP सध्या गोव्यात किंगमेकर आहे. त्यामुळे जो पक्ष आम्हाला मुख्यमंत्री पद द्यायला तयार असेल त्याच्यासोबत आम्ही जाऊ. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे उमेदवार नरेश सावल यांनी दिली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पुन्हा एकदा आघाडीवर तीनशेहून अधिक मतांची आघाडी

गोव्यातील बाबूश मोन्सेरात (पणजी), विजय सरदेसाई हे गोवा फॉरवर्ड पक्षाचे फातोर्डामधून आघाडीवर

याशिवाय विश्वजीत राणे आणि त्यांची दिव्या राणे या देखील आपल्या मतदारसंघातून आघाडीवर. दिव्या राणे या पर्ये (Poriem) तर विश्वजीत राणे वाळपई (Valpoi) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पिछाडीवर, मात्र कलांमध्ये भाजपला 19 जागांवर आघाडी

गोव्यातील चित्र पुन्हा बदललं, भाजप 18 तर काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर

भाजपचे बाबूश मोन्सेरात आणि जेनिफर मोन्सेरात हे दोघेही आपआपल्या मतदारसंघातून आघाडीवर, बाबूश हे पणजी तर जेनिफर या ताळगाव मतदारासंघातून निवडणूक लढवत आहेत.

- पहिल्या कलांमध्ये बाबूश मोन्सेरात हे 300 मतांनी आघाडीवर, पोस्टल बॅलेटमध्ये उत्पल पर्रिकर हे आघाडीवर होते. पण आता ते काहीसे मागे पडले आहेत.

मी कॉंग्रेस सोबत कधीच नव्हतो, भाजपने माझा विश्वासघात केला आहे. राज्याला फायदा होईल अशीच भूमिका घेईन: लक्ष्मीकांत पार्सेकर

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in