Corona : मुंबईत लॉकडाऊन की मिनी लॉकडाऊन? महापौर किशोरी पेडणेकरांनी दिलं उत्तर

जाणून घ्या किशोरी पेडणेकर यांनी नेमकं काय उत्तर दिलं आहे?
Corona : मुंबईत लॉकडाऊन की मिनी लॉकडाऊन? महापौर किशोरी पेडणेकरांनी दिलं उत्तर

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. मुंबईत शुक्रवारी तर 20 हजार रूग्णांची नोंद झाली. त्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाली आहे ती लॉकडाऊन लागणार की निर्बंध कठोर होणार याची. याबाबत आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही मुंबईतील रुग्णसंख्या 20 हजारांच्या पुढे गेली तर लॉकडाउन लागण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. तसेच शुक्रवारी वाढत्या रुग्णसंख्येवरुन महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मिनी लॉकडाउनचा इशारा दिला होता. मात्र आता मुंबईत रुग्णसंख्या वाढत असली तर लॉकडाउन लागणार नसल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Corona : मुंबईत लॉकडाऊन की मिनी लॉकडाऊन? महापौर किशोरी पेडणेकरांनी दिलं उत्तर
डिझायनर मास्कवरून अजित पवारांच्या सूचना, किशोरी पेडणेकरांचा शुक्रवारी मॅचिंग मास्क, शनिवारी N95 मास्क

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

20 हजार रुग्णांमध्ये लक्षणे नसणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आपण डेंजर झोनमध्ये गेलेलो नाहीत. लोक बाधित आहेत पण त्यांना लक्षणे नाहीत. 20 हजार रुग्णांपैकी 17 हजार रूग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. लॉकडाउन आणि मिनीलॉकडाउन हे शब्द घाबरवण्यासाठी नाहीत. आम्ही कुणालाही घाबरवत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आमच्यावर आहेत.

आपण योग्य काळजी घेतली तर त्याला रोखता येऊ शकतो. काळजी घेतली तर लॉकडाउनला रोखता येऊ शकते. पण ज्या पद्धतीने गर्दी होत आहे आणि विरोधक भडकवत आहेत त्याचाच परिणाम गंभीर झाला तर पर्याय काय आहे? लॉकडाउन या शब्दापासून लांब राहायचे असेल तर काळजी घ्या असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Corona : मुंबईत लॉकडाऊन की मिनी लॉकडाऊन? महापौर किशोरी पेडणेकरांनी दिलं उत्तर
अजित पवार कानीकपाळी ओरडून सांगत होते मास्क लावा, ज्यांनी लावला नाही त्या सगळ्यांना झाला कोरोना

मुंबईतल्या रोज वाढणऱ्या कोव्हिड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी बीकेसी कोव्हिड सेंटरची पाहणी केली. मुंबईत चौपट वेगाने रुग्णवाढ होतं असून घाबरण्यापेक्षा नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहान किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी भाजपाच्या किरीट सोमय्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली आहे.

'घाबरण्यापेक्षा आपण काळजी घेऊया. घाबरवणे हे आमच्या रक्तात नाही आणि आम्हीसुद्धा घाबरत नाही. खुर्चीत गांजा मारून कुणालाही बोलता येते. पण परिस्थिती तपासून पाहताना आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला धाडस दिलं आहे. उद्याच्या मृत्यू आला तरीही मी घाबरत नाही. त्यामुळे तेवढं धाडस आपण दाखवावे' असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in