'मी सांगितलं ना मुख्यमंत्री सभागृहात येतील, आता काय स्टॅम्पवर लिहून देऊ?', अजित पवारांनी का दिलं असं उत्तर?

Ajit Pawar PC: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं
'मी सांगितलं ना मुख्यमंत्री सभागृहात येतील, आता काय स्टॅम्पवर लिहून देऊ?', अजित पवारांनी का दिलं असं उत्तर?
look at the answer given by ajit pawar regarding the health of chief minister uddhav thackeray

मुंबई: 'मी सांगितलं ना मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत ते. काय आता स्टॅम्पवर लिहून देऊ?' अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यानंतर पत्रकार परिषदेत घेण्यात आली. यावेळी अजित पवारांना पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीविषयी देखील प्रश्न विचारण्यात आले.

पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले?

प्रश्न: मुख्यमंत्र्यांची प्रकृती कशी आहे?

अजित पवार: मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली आहे. मुख्यमंत्री आज वर्षावरही गेले होते. त्या दिवशी मुख्यमंत्री विधिमंडळात आले होते. वरच्याही सभागृहात गेले, खालच्याही सभागृहात गेले. आताही त्यांनी आम्हा सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याच्या सूचनाही आम्हा सर्वांना दिल्या.

उद्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची बैठक ही 9 वाजता विधिमंडळात लावायला सांगितली आहे. त्यात बाळासाहेब थोरात, मी, एकनाथ शिंदे, जयंत पाटील आम्हा सगळ्यांना ती बैठक घ्यायला सांगितली आहे.

तसंच मुख्यमंत्र्यांनी सर्व कॅबिनेटला सांगितलं आहे की, मी तिथे माझ्या सोयीने केव्हाही तिथे उपस्थित राहीन, केव्हाही तिथे येईन. व्यवस्थितपणे सर्वांनी काम करायचं आहे. असं त्यांनी सांगितलं आहे.

मी सांगितलं ना मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत ते. काय आता स्टॅम्पवर लिहून देऊ?

प्रश्न: चंद्रकांत पाटलांनी म्हटलं की, मुख्यमंत्री 45 दिवस..

अजित पवार: आता आपण ज्या व्यक्तीचं नाव घेतलं त्यांना आरोप करण्याशिवाय दुसरं काहीही सुचत नाही. आधी तर ते असंही म्हणत होते की, आता सगळं झालेलं आहे. आता फक्त राष्ट्रपती राजवटच लावायची बाकी आहे असं वक्तव्य ते करत होते. 170 आमदारांचा पाठिंबा असेल तर लोकशाहीमध्ये जर एका केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे इथले प्रांताध्यक्ष अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील तर धन्य आहे मग. यावर काही न बोललं बरं.

जर त्यांना वाटतं की, सरकारकडे बहुमत नाही तर त्यांनी अविश्वास ठराव आणावा. आम्ही आमचं बहुमत पुन्हा दाखवू. अध्यक्षपदाची निवड याच अधिवेशनात होणार आहे. असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.

look at the answer given by ajit pawar regarding the health of chief minister uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या चहापानाला ऑनलाईन उपस्थिती

दर आठवड्याला मुख्यमंत्री हे कॅबिनेट घेत आहेत. 10-12 विषय कॅबिनेटला मंजूर होत आहेत. कॅबिनेट ज्या वेळेस घेतात त्या वेळेस त्या मंत्र्याकडून मुख्यमंत्र्यांकडे सहीला जाते. मुख्यमंत्री त्यावर सह्या देखील करतात.

याशिवाय व्हीसीवर मुख्यमंत्री कोरोनासंबंधी आढावा बैठकी घेतात. इतर सगळ्या आढावा बैठकी घेतात. मुख्यमंत्री वर्षावर आले होते. तिथे त्यांनी काही मंत्र्यांना बोलावलं होतं. तिथे त्यांनी चर्चा केली. कामकाज व्यवस्थित चाललं आहे. आता आपल्याला कामकाज व्यवस्थित चालल्याचं दिसतंय ना.. आता विरोधकांनी तशाच प्रकारचा चष्मा लावला आहे त्यांना त्या चष्मातून तेच दिसतंय तर करायचं काय?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in