'योगीं'ची सक्ती! १७ हजार भोंग्याचा आवाज झाला कमी, तर १२५ ठिकाणचे भोंगे उतरवले

Loudspeaker Controversy yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले होते स्पष्ट आदेश
'योगीं'ची सक्ती! १७ हजार भोंग्याचा आवाज झाला कमी, तर १२५ ठिकाणचे भोंगे उतरवले
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ/Loudspeaker Controversy

महाराष्ट्रासह देशभरात भोंग्यांचा मुद्दा तापताना दिसत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश सरकारने भोंग्यासंदर्भात आदेश काढला. त्यानंतर राज्यात तब्बल १७ हजार भोंग्यांचा आवाज कमी झाला आहे. त्याबरोबर श्रीकृष्ण जन्मभूमीसह १२५ ठिकाणचे भोंगे हटवले गेले आहेत.

धार्मिक प्रार्थना स्थळांवर लावण्यात आलेल्या भोंग्यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारने कडक पावलं उचलली आहेत. सरकारने काढलेल्या आदेशानंतर १७ हजार भोंग्यांचा आवाज कमी केला गेला आहे. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी (कायदा) यासंदर्भातील माहिती दिली आहे. भोंग्यासंदर्भात राज्यात उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात असल्याचं अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं.

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात १२५ ठिकाणचे भोंगे हटवण्यात आले आहेत. तर १७ हजार ठिकाणी लोकांनी स्वतःहून भोंग्यांचा आवाज कमी केला आहे. अलविदा नमाज बद्दल सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. शांती समितीच्या बैठका होत आहेत, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ/Loudspeaker Controversy
Loudspeaker Rules : भोंगे लावण्याबाबत कायदा काय सांगतो?, नियम मोडले तर काय आहे शिक्षा?

३७ हजार धर्म गुरूंशी चर्चा

प्रशांत कुमार यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशात जवळपास ३७ हजार ३४४ धर्म गुरूंशी चर्चा करण्यात आली. ३१ हजार जागांवर ईदची नमाज अदा केली जाणार आहे. त्याचबरोबर ७,५०० ईदगाह आणि २० हजार मशिदींमध्ये नमाज अदा केली जाणार आहे. त्यासाठी राज्यात ४८ तुकड्या, केंद्रीय निमलष्करी बलाच्या ७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा दिला गेला आहे. सर्वच जिल्ह्यांत जिल्ह्यातील सुरक्षा दल सुरक्षेवर असणार आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ/Loudspeaker Controversy
Dilip Walse-Patil: भोंगा वाजणारच, पण..., राज ठाकरे न गेलेल्या बैठकीत काय ठरलं?

श्री कृष्ण जन्मभूमी येथेही हटवण्यात आले भोंगे

उत्तर प्रदेशात श्री कृष्ण जन्मभूमी येथील भोंगेही हटवण्यात आले आहेत. मंदिर परिसरात असलेल्या भागवत भवन येथील कळसावर भोंगे लावलेले होते. इथे एक ते दीड तास मंगलाचरण आणि विष्णू सहस्त्रनाम वाजवलं जातं. हे आता थांबवण्यात आलं आहे.

गोरखनाथ मंदिरातील भोंग्याचा आवाज कमी

श्री कृष्ण जन्मभूमी मंदिरातील भोंगे हटवण्यात आले, तर गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिर परिसरातील भोंग्यांचा आवाज कमी करण्यात आला आहे. याशिवाय कानपूर, लखनऊ, नोएडा आणि अन्य शहरांतील धार्मिक स्थळांवरील भोंगेही हटवण्यात आले आहेत. तर इतर भोंग्याचा आवाज उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कमी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ/Loudspeaker Controversy
...तर पंतप्रधान मोदींच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाचा- भास्कर जाधवांनी राणांना फटकारलं

परवानगीशिवाय काढता येणार नाही शोभयात्रा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाला निर्देश दिले होते. ज्यात त्यांनी म्हटलं होतं की, सर्व धार्मिक कार्यक्रमांवर आणि धार्मिक ठिकाणांवर शांतता राहिल यासाठी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची धार्मिक शोभयात्रा काढली जाता कामा नये. त्याचबरोबर अशा ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या भोंग्यांमुळे इतरांना त्रास होता कामा नये, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

Related Stories

No stories found.