राज ठाकरेंकडून नियमांचा भंग?, गृहमंत्री वळसे-पाटलांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्याकडून पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचा भंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गृह विभागाने औरंगाबाद पोलिसांकडे यासंदर्भातील अहवाल मागवला आहे.

३ मे पर्यंत भोंगे उतरवा नाहीतर ४ मेपासून काहीही ऐकून घेणार नाही, असं भडक विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलची चर्चा सुरू आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात आज गृहमंत्र्यांनी बैठक बोलावली असून, या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

Raj Thackeray: ‘एकदा काय ते होऊन जाऊ द्या!’, अजान सुरु होताच राज ठाकरे भडकले!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे सभा झाली. या सभेला औरंगाबाद पोलिसांनी सशर्त परवानगी दिली होती. दरम्यान, राज ठाकरेंकडून नियमांचं उल्लंघन झालंय का, अशी माहिती गृह विभागाने आता औरंगाबाद पोलिसांकडे मागितली आहे. जर नियमभंग झालेले असेल, तर योग्य कारवाई केली जाईल, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

औरंगाबाद पोलिसांच्या विविध स्थानिक शाखांकडून आलेले अहवाल आज गृह विभागाला पाठवण्यात येणार आहे. औरंगाबाद पोलिसांच्या विशेष शाखेचे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाकडून दररोज एसआयडीला अहवाल पाठवण्यात येतो. तो अहवाल पोलीस महासंचालकांना पाठण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी, औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे बरसले

ADVERTISEMENT

प्राथमिक अहवालांचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अभ्यास करण्यात आला असून, गृहमंत्र्यांसोबत मुंबईत होणाऱ्या आजच्या बैठकीत याचा आढावा घेतला जाणार आहे. प्रथम दर्शनी राज ठाकरे यांच्याकडून नियमांचं उल्लंघन झाल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस आले आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करायची यांचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली. त्यानंतर अंतिम अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवला जाईल, अशी माहिती आहे. राज ठाकरे किंवा आयोजकांविरुद्ध वरिष्ठांना अहवाल दिल्यानंतर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे खोटं बोलले?, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुणी बांधली?

गृहमंत्री काय म्हणाले होते?

“काही अटी शर्थींवर त्यांना परवानगी देण्यात आली होती. भाषण झालं आहे. या भाषणात त्यांनी कोणत्या नियमांचं उल्लंघन केलंय, याबद्दल औरंगाबाद पोलीस आयुक्त तपास करत आहे. हा अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवला जाईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे म्हणालेले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT