Covid-19: महाराष्ट्रासाठी दिलासा.. कोरोना रुग्णांमध्ये घट, पाहा दिवसभरात किती रुग्ण सापडले

दिवसभरात एकही ओमिक्रॉन बाधितांची नोंद नाही: राज्याचा रिकव्हरी रेट 95.63 टक्के, 94 रुग्णांचा मृत्यू
maharashtra 14 thousand 372 new positive patients 94 deaths were recorded 1 february 2022
maharashtra 14 thousand 372 new positive patients 94 deaths were recorded 1 february 2022(फाइल फोटो)

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत आज (1 फेब्रुवारी) बरीच घट दिसून आली आहे. राज्यात काल (31 जानेवारी) 15 हजार 140 कोरोना बाधित सापडले होते. तर गेल्या 24 तासात राज्यात 14 हजार 372 रुग्णच आढळून आले आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेत आजचा कोरोना रुग्णांचा आकडा फारच कमी झाल्याचं दिसून येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 30 हजार 093 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 73,97,352 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 95.63 टक्के एवढा आहे.

दरम्यान, राज्यात आज 94 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.84 टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 7,47,82,391 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 77,35,481 (10.34 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात 10,69,596 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 2731 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पाहा गेल्या 24 तासात ओमिक्रॉनचे किती रुग्ण सापडले

राज्यात गेल्या 24 तासात एकही ओमिक्रॉन व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आलेसा आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 3221 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती ओमिक्रॉन रुग्ण?

  • मुंबई -1062

  • पुणे मनपा - 1238

  • पिंपरी चिंचवड -126

  • नागपूर - 244

  • सांगली -59

  • ठाणे मनपा -62

  • पुणे ग्रामीण - 66

  • मीरा भाईंदर -52

  • औरंगाबाद - 50

  • अमरावती - 36

  • कोल्हापूर -19

  • पनवेल -18

  • सातारा - 20

  • नवी मुंबई -24

  • उस्मानाबाद - 16

  • वर्धा - 15

  • रायगड - 13

  • अकोला - 12

  • कल्याण डोंबिवली -11

  • सोलापूर - 10

  • वसई विरार -7

  • बुलढाणा -6

  • अहमदनगर - 6

  • भिवंडी निजामपूर मनपा - 5

  • नाशिक - 5

  • लातूर, यवतमाळ - प्रत्येकी 4

  • नांदेड, भंडारा, परभणी, उल्हासनगर, जालना, गोंदिया -प्रत्येकी 3

  • गडचिरोली, नंदूरबार, जळगाव - प्रत्येकी 2

  • इतर राज्य -1

राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या - 3221

maharashtra 14 thousand 372 new positive patients 94 deaths were recorded 1 february 2022
Covid: 'कोरोना हा फक्त पैसा लुटण्याचा एक मार्ग आहे, मी मास्कही घालत नाही', 'या' स्टारचा दावा

मुंबईतील कोरोना रुग्णांची काय स्थिती?

मुंबईत मागील 24 तासात 803 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 1 हजार 800 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 10 लाख 19 हजार 088 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत आज घडीला 8 हजार 888 सक्रिय रूग्ण आहेत. 25 ते 31 जानेवारी या कालावधीतला ग्रोथ रेट 0.14 टक्के इतका आहे. मुंबईत दिवसभरात 7 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण 16 हजार 630 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in