Covid-19: महाराष्ट्रात दिवसभरात 15 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांचं निदान, 75 रुग्णांचा मृत्यू

दिवसभरात राज्यात एकही ओमिक्रॉन बाधितांची नोंद नाही: राज्याचा रिकव्हरी रेट 96.07 टक्के, 75 रुग्णांचा मृत्यू
maharashtra 15 thousand 252 new positive patients 75 deaths were recorded 3 february 2022
maharashtra 15 thousand 252 new positive patients 75 deaths were recorded 3 february 2022(फाइल फोटो)

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाचे 15 हजार 252 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात काल (2 जानेवारी) 18 हजार 067 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. आज यामध्ये किंचितशी घट झाली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 30 हजार 235 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 74,63,868 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 96.07 टक्के एवढा आहे.

दरम्यान, राज्यात आज 75 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.83 टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 7,50,99,654 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 77,68,800 (10.34 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात 9,05,696 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2610 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.गेल्या 24 तासात ओमिक्रॉनचे किती रुग्ण आढळले?

राज्यात गेल्या 24 तासात एकही ओमिक्रॉन व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. आजपर्यंत राज्यात एकूण 3334 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती ओमिक्रॉन रुग्ण?

  • मुंबई -1080

  • पुणे मनपा - 1244

  • पिंपरी चिंचवड -127

  • नागपूर - 286

  • सांगली -59

  • ठाणे मनपा - 80

  • पुणे ग्रामीण - 66

  • मीरा भाईंदर -52

  • औरंगाबाद - 51

  • अमरावती - 40

  • नवी मुंबई - 37

  • सातारा - 23

  • कोल्हापूर -19

  • पनवेल -18

  • उस्मानाबाद - 18

  • वर्धा - 15

  • रायगड - 14

  • अकोला - 12

  • कल्याण डोंबिवली -11

  • सोलापूर - 10

  • वसई विरार -7

  • सिंधुदुर्ग- 7

  • बुलढाणा -6

  • अहमदनगर - 6

  • नाशिक - 6

  • भिवंडी निजामपूर मनपा - 5

  • लातूर, यवतमाळ, उल्हासनगर - प्रत्येकी 4

  • नांदेड, भंडारा, परभणी, जालना, गोंदिया -प्रत्येकी 3

  • गडचिरोली, नंदूरबार, जळगाव - प्रत्येकी 2

  • इतर राज्य -1

राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या - 3334

maharashtra 15 thousand 252 new positive patients 75 deaths were recorded 3 february 2022
Team India Corona Case: शिखर धवनसह टीम इंडियाचे अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, WI सीरीजआधी मोठा धक्का

मुंबईतील कोरोना रुग्णांची काय स्थिती?

मुंबईत मागील 24 तासात 827 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 1 हजार 366 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 10 लाख 22 हजार 292 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत आज घडीला 7 हजार 601 सक्रिय रूग्ण आहेत. 27 ते 2 जानेवारी या कालावधीतला ग्रोथ रेट 0.11 टक्के इतका आहे. मुंबईत दिवसभरात 7 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण 16 हजार 647 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in