Covid-19: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये थोडीशी वाढ, मृतांचा आकड्याने पुन्हा वाढवली चिंता

दिवसभरात 113 ओमिक्रॉन बाधितांची नोंद: राज्याचा रिकव्हरी रेट 95.87 टक्के, 79 रुग्णांचा मृत्यू
maharashtra 18 thousand 067 new positive patients 79 deaths were recorded 1 february 2022
maharashtra 18 thousand 067 new positive patients 79 deaths were recorded 1 february 2022(फाइल फोटो)

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत आज (2 फेब्रुवारी) किंचितशी वाढ झाली आहे. राज्यात काल (1 जानेवारी) 14 हजार 372 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत घट होत होती. पण मागील 24 तासात पुन्हा एकदा रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आजचा दिवसभरात राज्यात 18 हजार 067 पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 36 हजार 281 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 74,33,633 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 95.87 टक्के एवढा आहे.

दरम्यान, राज्यात आज 79 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.84 टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 7,49,51,750 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 77,53,584 (10.34 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात 9,73,417 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2617 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पाहा गेल्या 24 तासात ओमिक्रॉनचे किती रुग्ण सापडले

राज्यात गेल्या 24 तासात 113 ओमिक्रॉन व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 109 रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि 4 रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 3334 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

maharashtra 18 thousand 067 new positive patients 79 deaths were recorded 1 february 2022
Team India Corona Case: शिखर धवनसह टीम इंडियाचे अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, WI सीरीजआधी मोठा धक्का

कोणत्या जिल्ह्यात किती ओमिक्रॉन रुग्ण?

 • मुंबई -1080

 • पुणे मनपा - 1244

 • पिंपरी चिंचवड -127

 • नागपूर - 286

 • सांगली -59

 • ठाणे मनपा - 80

 • पुणे ग्रामीण - 66

 • मीरा भाईंदर -52

 • औरंगाबाद - 51

 • अमरावती - 40

 • नवी मुंबई - 37

 • सातारा - 23

 • कोल्हापूर -19

 • पनवेल -18

 • उस्मानाबाद - 18

 • वर्धा - 15

 • रायगड - 14

 • अकोला - 12

 • कल्याण डोंबिवली -11

 • सोलापूर - 10

 • वसई विरार -7

 • सिंधुदुर्ग- 7

 • बुलढाणा -6

 • अहमदनगर - 6

 • नाशिक - 6

 • भिवंडी निजामपूर मनपा - 5

 • लातूर, यवतमाळ, उल्हासनगर - प्रत्येकी 4

 • नांदेड, भंडारा, परभणी, जालना, गोंदिया -प्रत्येकी 3

 • गडचिरोली, नंदूरबार, जळगाव - प्रत्येकी 2

 • इतर राज्य -1

राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या - 3334

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in