Covid-19: महाराष्ट्रासाठी गुड न्यूज, कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट

दिवसभरात राज्यात शून्य ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे: राज्याचा रिकव्हरी रेट 97.85 टक्के, 15 रुग्णांचा मृत्यू
maharashtra 2 thousand 068 new positive patients 15 deaths were recorded 18 february 2022
maharashtra 2 thousand 068 new positive patients 15 deaths were recorded 18 february 2022(फाइल फोटो)

मुंबई: महाराष्ट्रात आता हळूहळू कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होऊ लागली आहे. प्रशासनाच्या दृष्टीने ही फारच दिलासादायक बाब आहे. राज्यात आज (18 फेब्रुवारी) दिवसभरात 2 हजार 068 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट होताना दिसत आहे. त्यामुळेच आता राज्यातील सर्वच निर्बंध जवळजवळ हटविण्यात आले आहेत. ज्यामुळे संपूर्ण जनजीवन हे सुरळीत होत आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 4 हजार 709 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 76,86,670 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 97.85 टक्के एवढा आहे.

दरम्यान, राज्यात आज 15 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.82 टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 7,70,01,972 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 78,55,359 (10.20 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात 2,37,252 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1139 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज घडीला 21,159 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत राज्यात एकूण 4456 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी 3531 रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण 8904 नमुने हे जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 7991 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. आणि 913 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

maharashtra 2 thousand 068 new positive patients 15 deaths were recorded 18 february 2022
'कोरोना लाटेत काँग्रेसवाल्यांनी फक्त 500-1000 लोकांनाच फ्री तिकिटं दिली, पण...', पाहा PM मोदी काय म्हणाले

मुंबईतील कोरोना रुग्णांची काय स्थिती?

मुंबईत मागील 24 तासात 202 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 365 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 10 लाख 33 हजार 862 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के झाला आहे. तर मुंबईत आज घडीला 1 हजार 780 सक्रिय रूग्ण आहेत. 11 ते 17 फेब्रुवारी या कालावधीतला ग्रोथ रेट 0.03 टक्के इतका आहे. मुंबईत आज एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण 16 हजार 686 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in