Covid-19: राज्यात दिवसभरात आढळले 27 हजारांहून अधिक रुग्ण, 61 जणांचा मृत्यू

दिवसभरात 85 ओमिक्रॉन बाधितांची नोंद: राज्याचा रिकव्हरी रेट 94.91 टक्के, 61 रुग्णांचा मृत्यू
Covid-19: राज्यात दिवसभरात आढळले 27 हजारांहून अधिक रुग्ण, 61 जणांचा मृत्यू
maharashtra 27 thousand 971 new positive patients 61 deaths were recorded 29 january 2022(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई: मुंबईसह आता महाराष्ट्रातही कोरोना रुग्णसंख्येत घट असल्याचं दिसून येत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 27 हजार 971 कोरोना बाधित आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज (29 जानेवारी) दिवसभरात 50 हजार 142 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 72,92,791 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 94.91 टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान, राज्यात आज 61 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.85 टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 7,43,33,720 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 76,83,525 (10.34 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात 11,49,182 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 3,375 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पाहा गेल्या 24 तासात ओमिक्रॉनचे किती रुग्ण सापडले

राज्यात गेल्या 24 तासात 85 ओमिक्रॉन व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन परिषदेनं केलेल्या चाचणी निरीक्षणात नोंदवले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 3125 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती ओमिक्रॉन रुग्ण?

 • मुंबई -1054

 • पुणे मनपा - 1229

 • पिंपरी चिंचवड -122

 • नागपूर - 226

 • सांगली -59

 • ठाणे मनपा -54

 • पुणे ग्रामीण - 65

 • मीरा भाईंदर -52

 • कोल्हापूर -19

 • पनवेल -18

 • अमरावती - 32

 • सातारा -15

 • नवी मुंबई -13

 • उस्मानाबाद - 16

 • वर्धा - 15

 • अकोला - 12

 • कल्याण डोंबिवली -11

 • सोलापूर - 10

 • बुलढाणा -6

 • वसई विरार -7

 • भिवंडी निजामपूर मनपा -5

 • औरंगाबाद -39

 • अहमदनगर - 6

 • नाशिक - 5

 • लातूर - 4

 • नांदेड, यवतमाळ, भंडारा, परभणी, उल्हासनगर, जालना, गोंदिया -प्रत्येकी 3

 • गडचिरोली, नंदूरबार, जळगाव, रायगड - प्रत्येकी 2

 • इतर राज्य -1

राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या - 3125

maharashtra 27 thousand 971 new positive patients 61 deaths were recorded 29 january 2022
Mumbai Corona : मुंबईत संसर्गाचा वेग मंदावला; दैनंदिन रुग्णवाढीचा आलेख घसरला

मुंबईतील कोरोना रुग्णांची काय स्थिती?

मुंबईत मागील 24 तासात 1 हजार 411 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 3 हजार 547 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 10 लाख 12 हजार 921 रूग्णांनी कोरोना रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत आज घडीला 12 हजार 187 सक्रिय रूग्ण आहेत. 22 ते 28 जानेवारी या कालावधीतला ग्रोथ रेट 0.21 टक्के इतका आहे. मुंबईत दिवसभरात 11 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण 16 हजार 602 रूग्णांचा कोरोना मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in