Covid-19: महाराष्ट्रातून तिसरी लाट हद्दपार, राज्यातील मागील 24 तासातील कोरोनाची नेमकी स्थिती काय?

दिवसभरात राज्यात शून्य ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे: राज्याचा रिकव्हरी रेट 98.08 टक्के, 5 रुग्णाच्या मृत्यूची नोंद
Covid-19: महाराष्ट्रातून तिसरी लाट हद्दपार, राज्यातील मागील 24 तासातील कोरोनाची नेमकी स्थिती काय?
maharashtra 460 new positive patients 5 deaths were recorded 8 march 2022(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 460 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात कमी होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. आता हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने तिसरी लाट ही हद्दपार झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आज राज्यात 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

आज दिवसभरात राज्यात 460 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील सगळेच निर्बंध आता पूर्ण हटविण्यात आले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 718 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 77,18,541 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 98.08 टक्के एवढा आहे.

दरम्यान, राज्यात आज 5 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.82 टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 7,83,67,636 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 78,69,498 (10.04 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात 25,557 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 605 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज घडीला 3209 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

गेल्या 24 तासात ओमिक्रॉनचे किती रुग्ण आढळले?

राज्यात गेल्या 24 तासात एकही ओमिक्रॉन व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आलेले नाही.. आजपर्यंत राज्यात एकूण 5221 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्णांची काय स्थिती?

मुंबईत मागील 24 तासात 60 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 77 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 10 लाख 36 हजार 974 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के झाला आहे. तर मुंबईत आज घडीला 467 सक्रिय रूग्ण आहेत. 1 मार्च ते 7 मार्च या कालावधीतला ग्रोथ रेट 0.01 टक्के इतका आहे. मुंबईत आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण 16 हजार 692 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in