Covid-19: गुड न्यूज... तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्रात आज कोरोनाचा एकही बळी नाही!

दिवसभरात राज्यात शून्य ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे: राज्याचा रिकव्हरी रेट 98.04 टक्के, एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.
maharashtra 544 new positive patients 0 deaths were recorded 2 march 2022
maharashtra 544 new positive patients 0 deaths were recorded 2 march 2022(फाइल फोटो)

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये घट होत आहे. त्यामुळे कोरोना महाराष्ट्रातून हद्दपार होताना दिसत आहे. तसंच आणखी चांगली गोष्ट म्हणजे गेल्या 24 तासात राज्यात एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. 1 एप्रिल 2020 नंतर म्हणजे जवळजवळ दोन वर्षांनी आज (2 फेब्रुवारी) पहिल्यांदाच असं घडलं आहे.

गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येसोबत मृतांच्या संख्येत देखील घट होत होती. मात्र, आजच्या दृष्टीने सगळ्यात चांगली बाब म्हणजे एकही कोरोना रुग्ण दगावलेला नाही. आज दिवसभरात राज्यात फक्त 544 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. ज्यामुळे प्रशासनावर जो प्रचंड ताण होता तो कमी झालेला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 1007 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 77,13,575 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 98.05 टक्के एवढा आहे.

दरम्यान, राज्यात आज एकाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली नाही. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.82 टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 7,80,03,848 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 78,66,924 (10.09 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात 45,422 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 660 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज घडीला 6663 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत राज्यात एकूण 4771 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी 4629 रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण 9382 नमुने हे जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 8480 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. आणि 902 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

गेल्या 24 तासात ओमिक्रॉनचे किती रुग्ण आढळले?

राज्यात गेल्या 24 तासात 38 ओमिक्रॉन व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 4771 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्णांची काय स्थिती?

मुंबईत मागील 24 तासात 100 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 168 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 10 लाख 36 हजार 389 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के झाला आहे. तर मुंबईत आज घडीला 689 सक्रिय रूग्ण आहेत. 23 ते 1 मार्च या कालावधीतला ग्रोथ रेट 0.01 टक्के इतका आहे. मुंबईत आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण 16 हजार 691 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in