Covid-19: महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत घट, दिवसभरात आढळले 6 हजार 248 नवे कोरोना रुग्ण

Covid-19 Cases: दिवसभरात राज्यात एकही ओमिक्रॉन बाधितांची नोंद नाही: राज्याचा रिकव्हरी रेट 97.22 टक्के, 45 रुग्णांचा मृत्यू
Covid-19: महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत घट, दिवसभरात आढळले 6 हजार 248 नवे कोरोना रुग्ण
maharashtra 6 thousand 248 new positive patients 45 deaths were recorded 10 february 2022(फाइल फोटो)

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात दिवसभरात 6 हजार 248 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत बरीच घट झाली आहे. एकीकडे आता राज्यातील सर्वच निर्बंध जवळजवळ हटवले जात आहेत. अशावेळी आता रुग्णसंख्येत होणारी घट ही बरीच दिलासादायक आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 18 हजार 942 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 76,12,233 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 97.22 टक्के एवढा आहे.

दरम्यान, राज्यात आज 45 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.83 टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 7,60,40,567 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 78,29,633 (10.30 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात 5,53,175 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2386 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

गेल्या 24 तासात ओमिक्रॉनचे किती रुग्ण आढळले?

राज्यात गेल्या 24 तासात 121 ओमिक्रॉन व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 84 रुग्ण राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आणि 37 रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 3455 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती ओमिक्रॉन रुग्ण?

 • मुंबई -1080

 • पुणे मनपा - 1253

 • पिंपरी चिंचवड -127

 • नागपूर - 368

 • सांगली -59

 • ठाणे मनपा - 80

 • पुणे ग्रामीण - 66

 • मीरा भाईंदर -52

 • औरंगाबाद - 51

 • अमरावती - 42

 • नवी मुंबई - 37

 • सातारा - 23

 • कोल्हापूर -19

 • पनवेल -18

 • उस्मानाबाद - 18

 • वर्धा - 29

 • रायगड - 14

 • अकोला - 12

 • कल्याण डोंबिवली -11

 • सोलापूर - 10

 • वसई विरार -7

 • सिंधुदुर्ग- 15

 • बुलढाणा -6

 • अहमदनगर - 6

 • नाशिक - 6

 • भिवंडी निजामपूर मनपा - 5

 • लातूर - 6

 • यवतमाळ - 6

 • उल्हासनगर - 4

 • नांदेड, भंडारा, परभणी, जालना, गोंदिया -प्रत्येकी 3

 • धुळे, गडचिरोली, नंदूरबार, जळगाव - प्रत्येकी 2

 • इतर राज्य -1

राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या - 3334

maharashtra 6 thousand 248 new positive patients 45 deaths were recorded 10 february 2022
'कोरोना लाटेत काँग्रेसवाल्यांनी फक्त 500-1000 लोकांनाच फ्री तिकिटं दिली, पण...', पाहा PM मोदी काय म्हणाले

मुंबईतील कोरोना रुग्णांची काय स्थिती?

मुंबईत मागील 24 तासात 429 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 822 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 10 लाख 29 हजार 828 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के झाला आहे. तर मुंबईत आज घडीला 3 हजार 698 सक्रिय रूग्ण आहेत. 3 ते 9 फेब्रुवारी या कालावधीतला ग्रोथ रेट 0.07 टक्के इतका आहे. मुंबईत दिवसभरात 2 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण 16 हजार 678 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in