
मुंबई: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात दिवसभरात 5 हजार 455 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत आता आणखी घट झाल्याचं दिसून येत आहे. एकीकडे आता राज्यातील सर्वच निर्बंध जवळजवळ हटवले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत होणारी घट दिलासादायक बाब मानली जात आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 14 हजार 635 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 76,26,868 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 97.34 टक्के एवढा आहे.
दरम्यान, राज्यात आज 63 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.82 टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 7,61,9,626 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 78,35,088 (10.29 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात 6,10,718 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2392 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज घडीला 60,902 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासात ओमिक्रॉनचे किती रुग्ण आढळले?
राज्यात गेल्या 24 तासात 76 ओमिक्रॉन व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 3531 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती ओमिक्रॉन रुग्ण?
मुंबई -1080
पुणे मनपा - 1299
पिंपरी चिंचवड -127
नागपूर - 368
सांगली -59
ठाणे मनपा - 80
पुणे ग्रामीण - 70
मीरा भाईंदर -52
औरंगाबाद - 51
अमरावती - 54
नवी मुंबई - 37
सातारा - 23
कोल्हापूर -19
पनवेल -18
उस्मानाबाद - 18
वर्धा - 32
रायगड - 14
अकोला - 12
कल्याण डोंबिवली -11
सोलापूर - 10
वसई विरार -7
सिंधुदुर्ग- 16
बुलढाणा -6
अहमदनगर - 7
नाशिक - 6
भिवंडी निजामपूर मनपा - 5
लातूर - 6
यवतमाळ - 6
उल्हासनगर - 4
जालना - 11
नांदेड, भंडारा, परभणी, गोंदिया -प्रत्येकी 3
धुळे, गडचिरोली, नंदूरबार, जळगाव - प्रत्येकी 2
इतर राज्य -1
राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या - 3531
मुंबईतील कोरोना रुग्णांची काय स्थिती?
मुंबईत मागील 24 तासात 367 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 841 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 10 लाख 30 हजार 669 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के झाला आहे. तर मुंबईत आज घडीला 3 हजार 698 सक्रिय रूग्ण आहेत. 4 ते 10 फेब्रुवारी या कालावधीतला ग्रोथ रेट 0.07 टक्के इतका आहे. मुंबईत दिवसभरात 1 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण 16 हजार 679 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.