Covid-19: महाराष्ट्रात दिवसभरात 92 कोरोना रुग्णांचा मृत्यू, 7 हजाराहून अधिक नव्या रुग्णांचं निदान

दिवसभरात राज्यात एकही ओमिक्रॉन बाधितांची नोंद नाही: राज्याचा रिकव्हरी रेट 97.06 टक्के, 92 रुग्णांचा मृत्यू
maharashtra 7 thousand 142 new positive patients 92 deaths were recorded 9 february 2022
maharashtra 7 thousand 142 new positive patients 92 deaths were recorded 9 february 2022

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 92 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर राज्यात दिवसभरात 7 हजार 142 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मागील दोन दिवसांच्या तुलनेत यामध्ये काहीशी वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही काहीशी चिंतेची बाब आहे. एकीकडे आता राज्यातील सर्वच निर्बंध जवळजवळ हटवले जात आहेत. अशावेळी रुग्णांचे वाढते मृत्यू ही बाब चिंतेची ठरत आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 20 हजार 222 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 75,93,291 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 97.06 टक्के एवढा आहे.

दरम्यान, राज्यात आज 92 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.83 टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 7,59,05,676 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 78,23,385 (10.31 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात 5,78,076 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2396 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

गेल्या 24 तासात ओमिक्रॉनचे किती रुग्ण आढळले?

राज्यात गेल्या 24 तासात एकही ओमिक्रॉन व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. आजपर्यंत राज्यात एकूण 3334 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती ओमिक्रॉन रुग्ण?

  • मुंबई -1080

  • पुणे मनपा - 1244

  • पिंपरी चिंचवड -127

  • नागपूर - 286

  • सांगली -59

  • ठाणे मनपा - 80

  • पुणे ग्रामीण - 66

  • मीरा भाईंदर -52

  • औरंगाबाद - 51

  • अमरावती - 40

  • नवी मुंबई - 37

  • सातारा - 23

  • कोल्हापूर -19

  • पनवेल -18

  • उस्मानाबाद - 18

  • वर्धा - 15

  • रायगड - 14

  • अकोला - 12

  • कल्याण डोंबिवली -11

  • सोलापूर - 10

  • वसई विरार -7

  • सिंधुदुर्ग- 7

  • बुलढाणा -6

  • अहमदनगर - 6

  • नाशिक - 6

  • भिवंडी निजामपूर मनपा - 5

  • लातूर, यवतमाळ, उल्हासनगर - प्रत्येकी 4

  • नांदेड, भंडारा, परभणी, जालना, गोंदिया -प्रत्येकी 3

  • गडचिरोली, नंदूरबार, जळगाव - प्रत्येकी 2

  • इतर राज्य -1

राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या - 3334

maharashtra 7 thousand 142 new positive patients 92 deaths were recorded 9 february 2022
'कोरोना लाटेत काँग्रेसवाल्यांनी फक्त 500-1000 लोकांनाच फ्री तिकिटं दिली, पण...', पाहा PM मोदी काय म्हणाले

मुंबईतील कोरोना रुग्णांची काय स्थिती?

मुंबईत मागील 24 तासात 441 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 1 हजार 115 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 10 लाख 29 हजार 006 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के झाला आहे. तर मुंबईत आज घडीला 4 हजार 096 सक्रिय रूग्ण आहेत. 2 ते 8 फेब्रुवारी या कालावधीतला ग्रोथ रेट 0.08 टक्के इतका आहे. मुंबईत दिवसभरात 9 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण 16 हजार 676 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in