Covid-19: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट, दिवसभरात फक्त 'एवढ्या' रुग्णांची नोंद

दिवसभरात राज्यात 62 ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे: राज्याचा रिकव्हरी रेट 97.99 टक्के, 12 रुग्णांचा मृत्यू
maharashtra 973 new positive patients 12 deaths were recorded 25 february 2022
maharashtra 973 new positive patients 12 deaths were recorded 25 february 2022(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याचं दिसून येत आहे. दिवसभरात राज्यात फक्त 973 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात गेल्या 24 तासात 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. जी प्रशासनाच्या दृष्टीने खरोखरच दिलासादायक बाब आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 2 हजार 521 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 77,04,733 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 97.99 टक्के एवढा आहे.

दरम्यान, राज्यात आज 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.82 टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 7,75,74,774 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 78,62,650 (10.20 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात 1,56,920 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 801 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज घडीला 8688 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत राज्यात एकूण 4629 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी 4456 रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण 9382 नमुने हे जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 8333 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. आणि 1049 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

गेल्या 24 तासात ओमिक्रॉनचे किती रुग्ण आढळले?

राज्यात गेल्या 24 तासात 62 ओमिक्रॉन व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 4629 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

maharashtra 973 new positive patients 12 deaths were recorded 25 february 2022
भारतीयांना मिळणार एका डोसवाली कोरोना लस; DCGI ने आपतकालीन वापरला दिली परवानगी

मुंबईतील कोरोना रुग्णांची काय स्थिती?

मुंबईत मागील 24 तासात 128 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 200 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 10 लाख 35 हजार 626 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के झाला आहे. तर मुंबईत आज घडीला 1 हजार 014 सक्रिय रूग्ण आहेत. 18 ते 24 फेब्रुवारी या कालावधीतला ग्रोथ रेट 0.02 टक्के इतका आहे. मुंबईत आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण 16 हजार 691 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in