सात किलो Uranium सहित दोघांना अटक, महाराष्ट्र ATS ची कारवाई

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र ATS ने धडक कारवाई करत सात किलो युरेनियमसह दोघांना अटक केली आहे. युरेनियम हे प्रचंड स्फोटक आणि ज्वलनशील आहे. युरेनियम खरेदी करण्यासाठी कोणी तयार होत आहे का? याचा शोध हे दोघेजण घेत होते. त्यावेळीच एटीएसने छापा टाकून या दोघांना अटक केली आहे. या युरेनियमची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत ही सुमारे 21 कोटी रूपये आहे. युरेनियमचा वापर हा स्फोटकं आणि अण्वस्त्र तयार करण्यासाठी केला जातो.

जळगाव : अपशकुनी ठरवत पोटच्या मुलीला करत होते मारहाण, आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल

नैसर्गिक रूपात उपलब्ध असलेलं हे युरेनियम जप्त करण्यात आलं आहे. अणू उर्जा कायदा 1962 च्या अंतर्गत युरेनियम जवळ बाळगलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडे 7 किलो 100 ग्रॅम युरेनियम आढळून आलं आहे ज्याची किंमत सुमारे 21 कोटी 30 लाख रूपये इतकी आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संतोष भालेकर यांना एक व्यक्ती युरेनियमचे तुकडे विकणार असल्याची माहिती त्यांच्या खबऱ्यांकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीचं नाव जिगर पांड्या असं आहे. जिगर पांड्या ठाण्यामध्ये राहतो. त्याचा मित्र अबू ताहिर याने त्याला हे तुकडे पुरवल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.

नेमकं काय घडलं होतं ‘हल्ला मोहल्ला’ कार्यक्रमावेळी? 400 जणांविरोधात गुन्हा दाखल

ADVERTISEMENT

महाराष्ट्र एटीएस पथकाने या दोघांकडे आढळलेला पदार्थ हा बीएआरसी येथील प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवला असता या चाचणीत हा पदार्थ नैसर्गिक आणि शुद्ध रूपातलं युरेनियम आहे हे स्पष्ट झालं. त्यानंतर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना युरेनियमची एका खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली होती असंही समजतं आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून त्या प्रयोगशाळेचीही तपासणी केली जाणार आहे. या दोघांनाही न्यायालयाने 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ADVERTISEMENT

या दोघांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात युरेनियम नेमकं कुठून आणि कसं आलं याचा शोध आता एटीएसतर्फे घेतला जातो आहे. प्रयोगशाळेतील व्यक्तीच्या मदतीनेच हा पदार्थ त्यांनी आणला असावा असाही संशय एटीएसला आहे त्यामुळे त्या अनुषंगानेही प्रयोगशाळेची चौकशी केली जाणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT