'बंद' पाळला नाही म्हणून शिवसेना उपमहापौरांच्या पतीनेच रिक्षा चालकांना दिला चोप?

Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंद आंदोलनातही रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांना शिवसेनेकडून ठाण्यात मारहाण करण्यात आल्याचे काही व्हीडिओ आता समोर आले आहेत.
'बंद' पाळला नाही म्हणून शिवसेना उपमहापौरांच्या पतीनेच रिक्षा चालकांना दिला चोप?
maharashtra bandh lakhimpur kheri thane shiv sena deputy mayor beaten auto rickshaw driver video viral

ठाणे: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथील शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज (11 ऑक्टोबर) बंद पुकारला होता. पण यावेळी अनेकांना दुकानं आणि इतर गोष्टी बंद करण्यास भाग पाडलं जात होतं. त्याचवेळी दुसरीकडे ठाण्याच्या उपमहापौरांचे पती हे स्वत: रस्तावर उतरुन रिक्षा चालकांना चोप देत असल्याचे व्हीडिओ व्हायरल होत असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केलेल्या या बंदमध्ये शिवसेना कार्यकर्ते मात्र, जबरदस्ती करत असल्याचं यावेळी दिसून आलं. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात उपमहापौरांचे पती पवन कदम हे स्वत: हातात काठी घेऊन रिक्षा चालकांना चोप देत असल्याचं आता विरोधकांकडून बोललं जात आहे. याचाच एक व्हीडिओ देखील आता समोर आला आहे.

दरम्यान, याबाबत जेव्हा 'मुंबई तक'ने पवन कदम यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी तो प्रकार आपण नाही तर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांकडून घडला असून आपण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचं म्हटलं. पण आपण बंदसाठी नव्हे तर रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेत असल्याने त्यांना शिवसेना स्टाईलने समजवत असल्याचा अजब दावा केला आहे.

पाहा पवन कदम नेमकं काय म्हणाले:

'सकाळी काही प्रमाणात रिक्षा सुरु होत्या. परंतु अशा रिक्षा सुरु होत्या ज्या शेअर रिक्षा. पण त्या रिक्षाचं भाडं हे अव्वाच्या सव्वा घेत होते. याचीच काही नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केली. आम्ही टेंभी नाक्याला त्या ठिकाणी होतो. त्यावेळी अनेकांनी आम्हाला सांगितलं की, रिक्षा भाडे हे 25 रुपयाला घ्यायला हवे होते. पण ते 100 किंवा 50 रुपये घेतले जात आहे.'

'अशावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची लूट होत असेल तर त्याचा जाब विचारण्याकरता काही रिक्षावाल्यांना आम्ही थांबवलं. नाही अशातला भाग नाही.. पण कोणालाही मारझोड केली नाही. ती क्लिप मी देखील पाहिली... जी व्हायरल होत आहे. त्यामध्ये आपल्याला कुठेही दिसणार नाही की, आम्ही रिक्षावाल्यांना मी स्वत: उपमहापौरांचा पती म्हणून पवन कदम म्हणून कुठे मारहाण केली असं कुठेही तुम्हाला दिसणार नाही. पण उलट आम्ही विनंती केली.'

maharashtra bandh lakhimpur kheri thane shiv sena deputy mayor beaten auto rickshaw driver video viral
'महाराष्ट्र बंद' आंदोलनात आघाडीमध्ये बिघाडी, यांचं चाललंय तरी काय?

'पण काही रिक्षावाल्यांना ऐकलं नाही. त्यांनी आगाऊपणा केला कारण त्यांनी आगाऊ भाडे घेतले होते. अशा लोकांना शिवसेना स्टाइलने उत्तर देणं गरजेचं होतं. पण त्यावेळी उपस्थितीत असलेल्या काही शिवसैनिकांकडून झालं असेल त्याबद्दल पवन कदम म्हणून वैयक्तिक आणि शिवसेनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो.' असं स्पष्टीकरण यावेळी पवन कदम यांनी दिलं आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर ठाण्यातील रिक्षा चालकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.