BJP vs Shiv Sena: शह-काटशहाचं राजकारण, केंद्राकडून ठाकरे सरकारला मोठा धक्का, राज्य सरकारचीही नवी चाल

Sitaram Kunte: मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मात्र, त्यांच्याबाबत एक वेगळा निर्णय घेतला आहे.
maharashtra chief secretary sitaram kunte did not get extension mva govt sought 6 months extension but centre denied
maharashtra chief secretary sitaram kunte did not get extension mva govt sought 6 months extension but centre denied

मुंबई: केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकार यांच्यात सातत्याने धुसफूस ही सुरुच आहे. अशातच आता केंद्र सरकारने राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना 6 महिन्यांची मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्राकडे शिफारस केली होती. मात्र केंद्र सरकारने ही शिफारस फेटाळली आहे. त्यामुळे सीताराम कुंटे यांना आज (30 नोव्हेंबर) सेवा निवृत्त व्हाव लागलं आहे.

मुदतवाढ न मिळाल्याने सीताराम कुंटे हे आता निवृत्त झाले आहेत. राज्य सरकारने त्यांच्यासाठी केंद्राकडे 6 महिन्यांची मुदतवाढ मागितली होती. परंतु केंद्राने ती नाकारली आहे. त्यामुळे आता 1986 च्या बॅचचे आयएएस असलेले अतिरिक्त सीएस देबाशीष चक्रवर्ती हे राज्याचे नवे मुख्य सचिव होणार आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने जरी सीताराम कुंटे यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला असला तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ त्यांच्या संदर्भात एक नवा निर्णय घेतल्याचंही समजतं आहे. यामुळे केंद्र सरकारला राज्य सरकारने नवी चाल खेळून आपल्या पद्धतीने उत्तर दिलं आहे.

'नुकतेच मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले सीताराम कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश आज दिले.' अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.

सीताराम कुंटे (राज्याचे माजी मुख्य सचिव)
सीताराम कुंटे (राज्याचे माजी मुख्य सचिव)

लवकरच मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील इतर महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन ठाकरे सरकार सीताराम कुंटे यांच्याकडेच मुख्य सचिवपद असावं यासाठी प्रयत्नशील होतं. मात्र, केंद्र सरकारने त्यांचे हे मनसुबे उधळून लावले आहेत. असं असल्याने आता मुख्यमंत्र्यांनी कुंटे यांची प्रधान सल्लागार पदी नियुक्ती केली आहे.

मात्र, या निर्णयामुळे प्रशासकीय पातळीवर त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण एकाच वेळी प्रशासकीय पातळीव दोन सत्ता केंद्र निर्माण होण्याची शक्यता अधिक असते आणि त्यातून प्रशासकीय वादही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींचा नेमका काय परिणाम होतो याकडेही जाणकारांचं लक्ष असणार आहे.

maharashtra chief secretary sitaram kunte did not get extension mva govt sought 6 months extension but centre denied
पोलीस बदली प्रकरण : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईडीचं समन्स

सीताराम कुंटे हे 1985 च्या महाराष्ट्र बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू अशीही त्यांची एक ओळख आहे. मुख्य सचिवपदी वर्णी लागण्याआधी ते गृह खात्याचे सचिव होते. मार्च 2021 पासून त्यांनी मुख्य सचिव पदाची धुरा सांभाळली होती. अखेर आज ( 30 नोव्हेंबर) त्यांना या पदावरुन निवृत्त व्हावं लागलं. मात्र असं असलं तरीही राज्याच्या प्रशासकीय कारभारात त्यांच्या शब्दाला यापुढेही वजन असणार आहे. कारण खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांची नेमणूक ही प्रधान सल्लागार पदी केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in