'आम्ही तोंडातून वाफा काढत नाही, जे बोलतो ते करून दाखवतो' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

जाणून घ्या नेमकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे?
'आम्ही तोंडातून वाफा काढत नाही, जे बोलतो ते करून दाखवतो' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.CMO Maharashtra/Twitter

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सामान्य मुंबईकरांनी गिफ्ट दिलं आहे. मुंबईकरांच्या 500 चौ. फुटापर्यंतच्या घरावरचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी जाहीर केला. या निर्णयाची तातडीने अमलबजावणी करा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
गर्दी नको, बेफिकीरीतून वाढलेला कोरोना संसर्गही नको! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आजारपणानंतर पहिल्यांदाच समोर येत ही घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या ऑनलाईन बैठकीला एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती होती. आम्ही तोंडातून वाफा काढत नाही जे बोलतो ते करून दाखवतो असाही टोला यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

'अनेकांना वाटलं असेल की मी टीव्हीवर बोलत आहे म्हणजे फक्त करोनावर बोलणार आहे. तशी आवश्यकता लागली तर काही दिवसांनी बोलेल. आजच्या महत्त्वाच्या निर्यणातून मला व्यक्तीशः अस्सल मुंबईकर, शिवसेनेचा पक्षप्रमुख आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आनंद होत आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असताना आपली जी काही पाळेमुळे आहेत ती विसरून चालणार नाही. 1966 पासून मुंबईत जन्माला आलेली शिवसेना आज कित्येक वर्षे मुंबईकरांच्या आशिर्वादाने मुंबई सांभाळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

शिवसेना प्रमुखांनी सुरु केलेले काम आज आम्ही पुढे नेत आहोत. मी सुद्धा नालेसफाईचे काम नाल्यामध्ये उतरून पाहिले आहे. आता माझा ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला आहे. मुंबईकर म्हटल्यावर फक्त त्यांनी करच भरायचे का? दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळतं हा खरा प्रश्न आहे. जनतेच्या कष्टातून सगळी कामे होत असतात. आपण ते काम केले आणि त्याची मोठी जाहिरात करायची ते मला स्वतःला पटत नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
"कोरोनावर बोलण्याची गरज पडू नये, पण..."; आजारपणानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच जनतेसमोर

2017 मध्ये शिवसेनेने वचननामा दिला होता. त्यातील अनेक वचने पूर्ण केले आहेत. पण मुंबईकरांसाठी 500 चौ. फूटांपर्यंत मालमत्ता कर रद्द करण्याचे वचन विचारपूर्वक दिले होते. 500 चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण आज पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो. अनेक जण येतात आणि अस बोलायचच असतं असे बोलून जातात. आम्ही तोंडातून वाफा काढत नाही. जे बोलतो ते करतो. मी मुंबईकरांना वचन देतो तुमच्या आरोग्याची आणि सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in