Covid19: महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनाचे किती सापडले नवे रुग्ण?

Maharashtra Daily Corona Reports: राज्यात 31 ऑक्टोबर 2021 रोजी 1172 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
first arrest cbi alleged santosh jagtap middleman case lodged against former maharashtra home minister anil deshmukh
first arrest cbi alleged santosh jagtap middleman case lodged against former maharashtra home minister anil deshmukh(फाइल फोटो)

राज्यात 31 ऑक्टोबर रोजी 1399 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 64,50,585 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.57 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 20 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.12 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,26,67,211 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66,11,078 (10.55 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1,65,826 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 867 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 16,658 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

  • मुंबई (Mumbai) - 4 हजार 672

  • ठाणे (Thane) - 1 हजार 490

  • पुणे (Pune) - 3 हजार 432

  • नागपूर (Nagpur) - 74

  • नाशिक (Nashik)- 583

  • कोल्हापूर (Kolhapur) - 120

  • अहमदनगर (Ahmednagar) - 2 हजार 291

  • सातारा (Satara) - 473

  • सांगली (Sangli)- 476

  • औरंगाबाद (Aurnagabad)- 451

प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास मुंबईपाठोपाठ पुण्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 3 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय मुंबईत 4 हजाराहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे अहमदनगरमध्ये देखील सध्या 2 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

first arrest cbi alleged santosh jagtap middleman case lodged against former maharashtra home minister anil deshmukh
गेल्या दीड वर्षापासून एकही कोरोना रुग्ण न सापडलेलं महाराष्ट्रातील गाव!

मुंबईत दिवसभरात सापडले 315 रूग्ण पॉझिटिव्ह

मुंबईत दिवसभरात 315 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 429 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 7 लाख 33 हजार 318 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97 टक्के आहे. डबलिंग रेट 1567 दिवसांवर गेला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in