Anil Deshmukh: मोठी बातमी..  अखेर अनिल देशमुख ED कार्यालयात दाखल, नेमकं काय घडलं?
maharashtra ex home minister anil deshmukh accused money laundering case finally appeared ED office(फाइल फोटो, सौजन्य: फेसबुक)

Anil Deshmukh: मोठी बातमी.. अखेर अनिल देशमुख ED कार्यालयात दाखल, नेमकं काय घडलं?

Anil Deshmukh ED Office: माजी गृहमंत्री हे अचानक ईडी कार्यालयात दाखल झाले. गेले अनेक दिवस समन्स पाठवून देखील ईडीसमोर न आलेले अनिल देशमुख आज थेट ईडी कार्यालयात पोहचले आहेत.

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आतापर्यंत केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेकदा समन्स बजावले होते. मात्र, असं असूनही ते मागील अनेक महिन्यांपासून या यंत्रणांसमोर हजर होत नव्हते. मात्र सोमवारी (1 नोव्हेंबर) दुपारी बारा वाजेच्या सुमारास अनिल देशमुख हे अचानक मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले.

गेल्या अनेक महिन्यांपासून तपास यंत्रणांसमोर न आलेले देशमुख हे अचानक ईडी कार्यालयात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

दरम्यान, ईडी कार्यालयात अनिल देशमुख यांची कसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपलं गृहमंत्रीपद गमवावं लागलं होतं. तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला होता. अनेकदा त्यांच्या घरावर आणि काही इतर ठिकाणी छापेमारी देखील करण्यात आली होती. मात्र, तरीही देशमुख हे तपास यंत्रणांसमोर चौकशीसाठी हजर झाले नव्हते. मात्र, असं असताना आज अचानक ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

maharashtra ex home minister anil deshmukh accused money laundering case finally appeared ED office
माजी गृहमंत्री अनिल देशमुख हनीमूनला गेले का? अमृता फडणवीसांचा खोचक प्रश्न

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर सीबीआय आणि ईडी या दोन्ही केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. याचप्रकरणी या दोन्ही यंत्रणांकडूने नागपूर, मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

ईडीकडून अनिल देशमुख यांना चौकशीसाठी वारंवार समन्स बजावण्यात आलेलं होतं. पण देशमुख ईडीसमोर हजर झाले नव्हते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अशीही चर्चा सुरु होती की, अनिल देशमुख हे देश सोडून पळू तर गेलेले नाही ना? पण आज सकाळी अनिल देशमुख हे अचानक ईडी कार्यालयात आले आणि चर्चांना पूर्णविराम दिला.

दरम्यान, आता अनिल देशमुख हे स्वत: ईड कार्यालयता हजर राहिल्याने त्यांच्यावर ईडी काही कारवाई करणार की फक्त चौकशी करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.

maharashtra ex home minister anil deshmukh accused money laundering case finally appeared ED office
Anil Deshmukh: अनिल देशमुखांविरोधातील गुन्ह्यात CBI कडून पहिली अटक, 'मिडलमॅन'ला ठोकल्या बेड्या

अनिल देशमुखांविरोधातील गुन्ह्यात CBI कडून पहिली अटक

एकीकडे अनिल देशमुख हे सीबीआयसमोर हजर झालेले असले तरी दुसरीकडे रविवारी (31 ऑक्टोबर) अनिल देशमुखांविरोधातील गुन्ह्याक सीबीआयने एक मोठी कारवाई केली होती. सीबीआयने कालच या प्रकरणातील पहिली अटक करुन मोठी कारवाई केली होती.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात रविवारी पहिली अटक करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (CBI) संतोष शंकर जगताप याला ठाणे येथून अटक केली आहे. या प्रकरणी कोर्टाने संतोष जगतापला चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ही अटक अनिल देशमुख यांची अडचण अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in