Covid 19 : महाराष्ट्र वेगाने तिसऱ्या लाटेकडे! दिवसभरात 9170 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.11 टक्के इतका झाला आहे
Covid 19 : महाराष्ट्र वेगाने तिसऱ्या लाटेकडे! दिवसभरात 9170 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

महाराष्ट्र वेगाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेकडे वळतो आहे हेच कोरोनाच्या रूग्णांचे वाढते आकडे सांगत आहेत. कारण दिवसभरात महाराष्ट्रात 9170 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात राज्यात 7 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 2.11 टक्के इतका झाला आहे.

आज दिवसभरात 1445 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 65 लाख 10 हजार 541 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.35 टक्के झाले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 91 लाख 36 हजार 643 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 87 हजार 991 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 26 हजार 1 व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत. तर 1064 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

Covid 19 : महाराष्ट्र वेगाने तिसऱ्या लाटेकडे! दिवसभरात 9170 नव्या कोरोना रूग्णांची नोंद
वाढत्या कोरोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर...

महाराष्ट्रात दिवसभरात ओमिक्रॉनचे सहा रूग्ण आढळले आहेत. या रूग्णांचे अहवाल बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी रिपोर्ट केले आहेत. हे सहा रूग्ण पुणे ग्रामीणमध्ये 3, पिंपरीत 2, पुणे महापालिका क्षेत्रात 1 असे आहेत. राज्यात ओमिक्रॉन रूग्णांची एकूण संख्या 460 झाली आहे.

कुठे आहेत 460 रूग्ण

मुंबई-327

पिंपरी-28

पुणे ग्रामीण-21

पुणे मनपा-13

ठाणे मनपा-12

नवी मुंबई, पनवेल- प्रत्येकी 8

कल्याण डोंबिवली-7

नागपूर, सातारा-प्रत्येकी 7

उस्मानाबाद-5

वसई-विरार-4

नांदेड-3

औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी, मीरा भाईंदर- प्रत्येकी 2

लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर-प्रत्येकी 1

Covid 19 : महाराष्ट्र वेगाने तिसऱ्या लाटेकडे! दिवसभरात 9170 नव्या कोरोना रूग्णांची नोंद
Omicron : पुढचे दोन आठवडे महाराष्ट्रासाठी आव्हानात्मक, कोव्हिड टास्क फोर्सने असं का म्हटलं आहे?

यातील 26 रूग्ण प्रत्येकी एक पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहेत. सात रूग्ण ठाणे, चार रूग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत तर नऊ रूग्ण विदेशी नागरिक आहेत. यापैकी 180 रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर टेस्ट चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 1806 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 102 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. राज्यात आज रोजी एकूण 32,225 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ९,१७० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,८७,९९१ झाली आहे.

मुंबईत कोरोना रूग्णसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. दिवसभरात 6347 रूग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 451 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात 1 रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज दिवसभरात मुंबईत 47 हजार 978 चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

मुंबईत आत्तापर्यंत एकूण 7 लाख 50 हजार 158 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबईत आत्तापर्यंत एकूण 16 हजार 377 मृत्यू झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 95 टक्के इतका झाला आहे. मुंबईचा डबलिंग रेट 251 दिवसांवर आला आहे. मुंबईत सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या आता 157 इतकी झाली आहे. तर झोपडपट्टी आणि चाळींमधल्या कंटेन्मेंट झोनची संख्या 10 झाली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in