maharashtra government cabinet expansion latest live updates eknath shinde devendra fadnavis
maharashtra government cabinet expansion latest live updates eknath shinde devendra fadnavis

Maharashtra cabinet expansion : अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाला! असं आहे शिंदेंचं मंत्रिमंडळ

Eknath shinde-devendra fadnavis government cabinet : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी घेतली होती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला. आज (९ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता राजभवनात पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होत आहे.

राजभवनात शपथविधी सोहळा सुरू, लाईव्ह बघण्यासाठी येथे क्लिक करा

भाजप-शिंदे गटाच्या या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

१) राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)

२) सुधीर मुनगंटीवार (भाजप)

३) चंद्रकांत पाटील (भाजप)

४) विजयकुमार गावित (भाजप)

५) गिरीश महाजन (भाजप)

६) गुलाबराव पाटील (सेना)

७) दादा भुसे (सेना)

८) संजय राठोड (सेना)

९) सुरेश खाडे (भाजप)

१०) संदीपान भुमरे (सेना)

11) उदय सामंत (सेना)

१२) तानाजी सावंत (सेना)

१३) रविंद्र चव्हाण (भाजप)

१४) अब्दुल सत्तार (सेना)

15) दीपक केसरकर (सेना)

१६) अतुल सावे (भाजप)

१७) शंभुराज देसाई (सेना)

18) मंगलप्रभात लोढा (भाजप)

शपथ विधीसोहळा सुरू...

राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देताहेत मंत्रिपदाची शपथ.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शपथ घेणाऱ्या संभावित नेत्यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत असून, एकनाथ शिंदे बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत.

शपथविधी सोहळ्याची तयारी झाली, १८ खुर्च्यांवर कोण बसणार?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ११ वाजता होत असून, राजभवनात शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. शपथविधी सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्टेजवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्च्या वगळता इतर १८ खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे १८ जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे १८ खुर्च्यांवर कोण असणार, याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

maharashtra government cabinet expansion latest live updates eknath shinde devendra fadnavis
Maharashtra cabinet expansion : "8 ते 10 जणांना मंत्रिपद मिळेल, बाकीचे एकमेकांच्या उरावर बसायला मोकळे झाले"

मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यावर सांगतो -उदय सामंत

"मी बैठकीला आलेलो नाही. मी मुख्यमंत्र्यांच्या (एकनाथ शिंदे) भेटीला आलेलो आहे. बैठक झाल्यानंतर ही नावं कळतील. मी शपथ घेणार आहे की नाही, हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आल्यानंतर सांगतो, असं उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्यापूर्वी म्हणाले.

९-९चा फॉर्म्युला, १८ जण शपथ घेणार

मिळालेल्या माहितीप्रमाणे मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपकडून ९ आणि शिंदे गटाकडून ९ असे एकूण १८ जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ज्या १८ जणांना शपथ दिली जाणार आहे. त्यांना कालच निरोप गेला असून, सगळे मुंबईत दाखल झाले आहेत.

१० ते १८ ऑगस्ट दरम्यान होणार अधिवेशन

मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानं पावसाळी अधिवेशनही लांबवणीवर पडलं आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या निर्णयाबरोबरच पावसाळी अधिवेशनची तारीखही जवळपास निश्चित झाली आहे. विधिमंडळाचे रखडलेले पावसाळी अधिवेशन येत्या १० ते १८ ऑगस्ट दरम्यान होण्याची शक्यता आहे. कारण विधिमंडळ सचिवालयाकडून १० ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या कालावधीसाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सरकार अस्तित्वात आल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेत कायदेशीर लढाई सुरू झाली. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिका दाखल झालेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानं सरकारचं काय होणार अशीही चर्चा सुरू झाली. शिंदे सरकारची वैधता, अध्यक्षांची निवड आणि आमदार अपात्रतेच्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबत चालल्याचं बोललं जात होतं.

maharashtra government cabinet expansion latest live updates eknath shinde devendra fadnavis
'लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार'; देवेंद्र फडणवीसांचं युतीबद्दल मोठं विधान

सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची ३० जून रोजी शपथ घेतली होती. सरकार अस्तित्वात आल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, शिंदे गट-भाजपकडून सांगितलं जात होतं.

पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात १६ ते १८ जणांचा समावेश होण्याची शक्यता आहे. यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, संजय कुटे, राधाकृष्ण विखे-पाटील, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा आणि शिंदे गटातील दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई आदींना संधी मिळण्याची शक्यता आहे.

maharashtra government cabinet expansion latest live updates eknath shinde devendra fadnavis
दिवस आणि जागासुद्धा ठरली! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे येणार एकत्र?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in