Covid 19 : नव्या वर्षांच्या सेलिब्रेशनला ब्रेक, आतषबाजी, मिरवणुकांना मनाई; 'या' आहेत मार्गदर्शक सूचना

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटोसोजन्य-आजतक

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करत असाल तर सावधान. राज्य सरकारने नव वर्षाच्या स्वागतासाठी करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना मनाई केली आहे. तसेच चौपाट्यांवर गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. राज्याच्या गृहविभागाने याबाबतची नवी नियमावलीच जारी केली आहे.

प्रतीकात्मक फोटो
नो सेलिब्रेशन! पुन्हा घरातच बसावं लागणार?; आरोग्यमंत्री टोपेंनी दिले कडक निर्बंधांचे संकेत

काय आहेत नियम?

31 डिसेंबर 2021 आणि 1 जानेवारी 2022 या दोन दिवशी स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी बाहेर न पडता नव्या वर्षाचं स्वागत घरीच आणि साधेपणाने करावं.

24/12 च्या आदेशान्वये राज्यात 25 डिसेंबर 2021 पासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्या आदेशाचं पालन करण्यात यावं.

कोव्हिड 19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन, महसूल आणि वन आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाचे 27 /11/ 2021 देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करण्यात यावं.

31 डिसेंबर 2021 आणि नवीन वर्ष 2022 च्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्केपर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना 25 टक्के मर्यादेत उपस्थित राहण्यास संमती असेल

सदर कोणतीही प्रकारे गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल त्याचप्रमाणे मास्क आणि सॅनेटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षांवरील नागरिकांनी आणि दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणं टाळावं.

31 डिसेंबरच्या दिवशांनी नागरिकांनी समुद्र किनारे, बाग, रस्ते अशा ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क, सॅनेटायझरचा वापर करावा.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटोफोटो-आज तक

मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरिन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी या ठिकाणीही नागरिकांनी गर्दी करू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक.

नववर्ष स्वागच्या निमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ नये तसंच कोणत्याही मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाचवेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावं. धार्मिक स्थळांशी संबंधितांनी आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी.

फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचं काटेकोर पालन कऱण्यात यावं

कोव्हिड 19 आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाटी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे

31 डिसेंबर आणि नवे वर्ष सुरू होईपर्यंत ज्या सूचना नव्याने प्रसिद्ध होतील त्यांचेही पालन करावे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in