महाराष्ट्रात बरे झालेल्या Corona रूग्णांपेक्षा पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या जास्त, 286 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात आज दिवसभरात 6 हजार 105 बरे होऊन घरी गेले आहेत. आज 6 हजार 857 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 60 लाख 64 हजार 856 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात 286 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 73 लाख 69 हजार 757 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 82 हजार 914 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 88 हजार 537 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 3364 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 82 हजार 545 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 6 हजार 857 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 62 लाख 82 हजार 914 इतकी झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि त्यातल्या सक्रिय रूग्णांची संख्या

मुंबई -6 हजार 921

ADVERTISEMENT

ठाणे- 9 हजार 587

ADVERTISEMENT

पुणे- 15 हजार 768

सांगली- 8 हजार 844

कोल्हापूर- 8 हजार 708

सोलापूर- 4 हजार 287

अहमदनगर- 4 हजार 709

नागपूर – 1 हजार 749

पुण्यात 15 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत. तसंच इतर जिल्ह्यांमध्ये रूग्णसंख्या कमी होताना दिसते आहे. मागील दोन आठवड्यापर्यंत ठाणे, मुंबई, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण होते. आता ते पुणे जिल्ह्यात आहेत. बीड आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांबाबत मात्र मंगळवारी केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्ण संख्या वाढते आहे असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.

मुंबईत 404 पॉझिटिव्ह रूग्ण

मुंबईत आज दिवसभरात 404 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 382 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत 7 लाख 11 हजार 697 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईचा डबलिंग रेट 1383 दिवसांवर गेला आहे. आज घडीला मुंबईत 5 हजार 280 सक्रिय रूग्ण आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT