
Maharashtra HSC Results 2022: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (12th Result) जाहीर झाला आहे. बोर्डाकडून निकालाची विभागनिहाय आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. यंदाच्याही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी ९५.३५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर ९३.२९ टक्के मुलं यंदाच्या निकालाच उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण होणाऱ्या मुला-मुलींची तुलना केली तर २.०६ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ५ टक्क्यांनी निकालात घसरण झाली आहे.
कोकण टॉपर तर मुंबई तळाला
सर्व विभागनिहाय मंडळांच्या निकालाची तुलना केली तर कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकणचा सर्वाधिक म्हणजेच ९७.२२ टक्के निकाल लागला असून मुंबई विभाग सर्वात तळाला आहे. मुंबईचा निकाल ९०.९१ लागला आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण - ९७.२२ टक्के
पुणे - ९३.६१ टक्के
कोल्हापूर - ९५.०७ टक्के
अमरावती - ९६.३४ टक्के
नागपूर - ९६.५२ टक्के
लातूर - ९५.२५ टक्के
नाशिक - ९५.०३ टक्के
औरंगाबाद - ९४.९७ टक्के
मुंबई - ९०.९१ टक्के
यंदाच्याही निकालात मुलींचीच बाजी
मागच्या वर्षीप्रमाणे यंदाच्याही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्यातील सर्व विभागाचा मुलींचा निकाल ९५.३५ टक्के लागला आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थांना निकाल पाहता येणार आहे.
असा चेक करा तुमचा निकाल
स्टेप 1 - http://www.indiatoday.in/education-today/result वर लॉन ऑन करा
स्टेप 2- - होमपेजवर, MSBSHSE १२वी निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा, ही साईट निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल.
स्टेप 3-- दिलेल्या रकान्यात तुमचा रोल नंबर व आईचं नाव टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
स्टेप 4- - त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. नंतर तुम्ही खाली स्क्रोल करून डाउनलोड करू शकता.