Babasaheb Purandare passed away: शिवछत्रपतींचा चालता-बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड, बाबासाहेब पुरंदरेंचं पुण्यात निधन

Babasaheb Purandare passes away: शिवछत्रपतींचा चालता-बोलता इतिहास अशी ओळख असलेले पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं सोमवारी (15 नोव्हेंबर) वयाच्या 100 व्या वर्षी पुण्यात निधन झालं.
Babasaheb Purandare passed away: शिवछत्रपतींचा चालता-बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड, बाबासाहेब पुरंदरेंचं पुण्यात निधन
Maharashtra notable historian author babasaheb purandare passes away at deenanath mangeshkar hospital of pune(फाइल फोटो)

पुणे: पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज (15 नोव्हेंबर) पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं आहे. (Babasaheb Purandare passes away) वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील तीन दिवसापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज पहाटे 5 वाजून 7 वाजून त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांचं एक पथक हे त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होऊन होते. मात्र, कालपासूनच ते उपचारांना साथ देत नव्हते.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे पार्थिव सकाळी 8. 30 वाजता पुण्यातील (Pune) पर्वती येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीस येथे अंत्यसंस्कार केले जातील.

बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतीच वयाची शंभरी गाठली होती. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित एक विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून अचानक बाबासाहेबांच्या प्रकृती बिघडली आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, वार्धाक्यामुळे ते उपचारांना अपेक्षित असा प्रतिसाद देत नव्हते.

आपल्या ओघवत्या वाणीने महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै रोजी 100 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. मात्र, आज त्यांच्या निधनाने शिवछत्रपतींचा चालता-बोलता इतिहास हा काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

आपल्या वयाची तब्बल 80 वर्ष शिवचरित्र प्रसाराचं काम करणारे बाबासाहेब पुरंदरे यांनी शेवटपर्यंत आपलं हे व्रत कायम ठेवलं. 'राजा शिवछत्रपती' ही त्यांची गाजलेली कांदबरी आजही सर्वाधिक खपाची कादंबरी आहे. आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष शिवचरित्राचा प्रसार करणाऱ्या बाबासाहेबांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर जेव्हा माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की, 'हौस आणि प्रचंड महत्वाकांक्षा असेलला माणूस कधीही समाधानी नसतो. म्हणूनच मी आनंदी असलो तरी समाधानी नाही.'

बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी थोडक्यात

बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुण्यात झाला होता. त्यामुळे पुणे हीच त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी होती. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘नारायण राव पेशवा',‘केसरी’यासारखी अनेक पुस्तकं लिहली. पण 'राजा शिवछत्रपती' या कादंबरीने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. याच कांदबरीमुळे बाबासाहेब हे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले.

याच कादंबरीवर आधारित पुरंदरे यांनी ‘जाणता राजा’हे नाटकही लिहलं. जे महाराष्ट्रात प्रचंड गाजलं. त्यांनी खऱ्या अर्थाने एका भव्यदिव्य नाटकांची निर्मिती केली होती. ज्याच हिंदीत देखील अनुवाद करण्यात आला होता. दरम्यान, फडणवीस सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित केलं होतं. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते देखील होते. अनेकदा ते संघाच्या जाहीर कार्यक्रमात देखील सहभागी व्हायचे.

बाबासाहेब पुरंदरेंचं साहित्य

बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रामुख्याने ऐतिहासिक विषयांवर विपुल लेखन केलं. तसंच ललित कादंबरी, नाट्यलेखन देखील त्यांनी केलं.

राजा शिवछत्रपती या गाजलेल्या कादंबरीसोबतच बाबासाहेबांनी शेलारखिंड, पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत यासरख्या काही कादंबऱ्यांचं देखील लेखन केलं. याशिवाय त्यांनी गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारं गडसंच याचं देखील लेखन केलं होतं. राजा शिवछत्रपती या त्यांच्या कांदबरीच्या आतापर्यंत 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. तर तब्बल 5 लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांनी जुलै महिन्यात वयाची शंभरी पूर्ण केली होती. त्यावेळी काही कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली होती. पण त्यानंतर ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला फारशी उपस्थिती लावत नव्हते. वार्धक्यामुळे ते फारसे घराबाहेर पडत नव्हेत. तसंच दसऱ्यानिमित्त होणाऱ्या संघाच्या शस्त्रपूजन कार्यक्रमालाही ते हजर राहिले नव्हते.

Maharashtra notable historian  author babasaheb purandare passes away at deenanath mangeshkar hospital of pune
Raj Thackeray and Babasaheb Purandare: '...तर महाराष्ट्रात तांडव करेन', तेव्हा राज ठाकरे असं का म्हणाले होते?

मीडियाशी साधलेल्या शेवटच्या संवादात काय म्हणाले होते बाबासाहेब पुरंदरे?

'छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर लोकांचं आज एवढं प्रेम आहे की, आज तीनशे वर्ष होऊन गेली तरीही त्या महापुरुषाला आम्ही एकही दिवस विसरत नाही. शिवाजी महाराज की जय म्हटल्याशिवाय आमच्या मुलांचं लहानपण साजरं होतं नाही. शिवाजी महाराजांचं चित्र लावल्याशिवाय आमच्या घराची भिंत सुंदर दिसत नाही.'

'मी शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. पण मी त्याकरिता काही वेगळं केलं का? तर काही नाही. फक्त एक म्हणजे मला कसलंही व्यसन नाही. मी असे शेकडो लोकं पाहिली आहेत की त्यांना कसलंही व्यसन नाही. मला वाटतं त्या विधात्याची इच्छा होती म्हणूनच मी शंभर वर्ष जगलो.'

'मला आणखी दोन-तीन वर्ष मिळाली तरी आजारी पडू देऊ नको एवढीच ईश्वराकडे माझी इच्छा आहे. या शंभर वर्षाच्या कालखंडात मी खूप शिकलो. शिकवण्याचा आव कधी मी आणला नाही.'

'छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा खूप मोठा विषय आहे. त्यामुळे अद्यापही त्यांच्याविषयी खूप गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. वयाची 99 वर्ष मी आनंदी आहे पण समाधानी मात्र नाही.' असं बाबासाहेब यावेळी म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in