महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, उद्धव ठाकरेंचा 'तो' फोटो सोमय्यांनी आणला समोर

Kirit Somaiya Tweet Photo: महाराष्ट्राच्या राजकारण खळबळ उडवून देणारा एक फोटो भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी समोर आणला आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
maharashtra politics big sensation a photo of uddhav thackeray and chandrakant patel was tweet by somaiya
maharashtra politics big sensation a photo of uddhav thackeray and chandrakant patel was tweet by somaiya (फाइल फोटो)

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar)यांची तब्बल 6.45 कोटीची संपत्ती अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED)जप्त करण्यात आली. यावेळी हे संपूर्ण प्रकरण मनी लाँड्रिंगचं असून त्यात पुष्पक ग्रुप आणि त्याचे महेश पटेल (Mahesh Patel) आणि चंद्रकांत पटेल (Chandrakant Patel) यांचं नाव आता समोर आलं आहे. याच पुष्पक ग्रुपच्या पुष्पक बुलियनच्या माध्यमातून पाटणकरांच्या कंपनीला पैसे फिरविण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. दरम्यान, पुष्पक ग्रुपचे चंद्रकांत पटेल यांचा उद्धव ठाकरेंसोबतचा एक फोटो भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोस्ट करुन याबाबत सवाल उपस्थित केले आहेत.

श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती कंपनीला जे पैसे पुरविण्यात आले होते. त्याचबाबत चंद्रकांत पटेल यांचं नाव समोर आलं आहे. याच चंद्रकांत पटेल यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो आता किरीट सोमय्यांनी पोस्ट करुन याबाबत सवाल उपस्थित केला आहे.

पाहा किरीट सोमय्यांनी यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे:

'श्रीधर पाटणकर मनी लाँडरिंगचे पुष्पक ग्रुपचे चंद्रकांत पटेल श्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत?' असं ट्विट सोमय्यांनी केलं आहे.

त्यामुळे याप्रकरणात सोमय्यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच एक प्रकारे बोट दाखवलं आहे. दरम्यान, सोमय्यांनी जो फोटो शेअर केला आहे त्याची सत्यता आम्ही तपासलेली नाही. तसेच हा फोटो नेमका कधीचा आहे याबाबतही सोमय्यांनी काहीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे आता याप्रकरणी सोमय्या आणखी कोणकोणते दावे करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चंद्रकांत पटेल हे सीए असल्याचं समजतं आहे. त्यांचे काही राजकीय नेत्यांशी देखील संबंध असल्याचं बोललं जातं. त्यामुळेच या सगळ्या प्रकरणात आता भाजप अधिक आक्रमक झालं आहे.

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय:

पुष्पक बुलियन या केसमध्ये 6.45 कोटी संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ही केस मार्च 2017 साली नोटाबंदीनंतर पुष्पक बुलियन नावाच्या एका कंपनीवर केला होता आणि त्यात तपास करताना असं आढळून आलं की, नंदकिशोर चतुर्वेदी हा एक खूप मोठा हवाला ऑपरेटर आहे. त्याच्याकडूनच जी एंट्री प्रोव्हाइड करण्यात आली होती पुष्पक रियालिटी डेव्हलपर यांना 20 कोटी रुपयांसाठी त्याने एंट्री प्रोव्हाइड केली होती.

म्हणजेच त्याने पुष्पक रियालिटी यांना रिसीट दिली, बिलं दिली, invoice दिले. त्यासाठी 20 कोटी रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले आणि त्याऐवजी 20 कोटी कॅश नंदकिशोर चतुर्वेदीने यांना दिलं असावं असं तपासात समोर आलं आहे.

त्यानंतर चतुर्वेदी याने बरचशा शेल कंपनी आहेत त्यांच्याकडून लेअरिंग करुन ते पैसे दुसऱ्या जागी फिरवले. चतुर्वेदी याच्या खूप साऱ्या शेल कंपनी आहेत. त्यात एक हमसफर डिलर प्रा. लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. त्या कंपनीने एक अनसिक्युरर्ड लोन 30 कोटी रुपयांचं श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लिमिटेड ही तीच कंपनी आहे जी श्रीधर माधव पाटणकर यांची कंपनी आहे. असं ईडीचं म्हणण आहे.

यात असं दिसून येतं की, हवाला मार्गाने हे 30 कोटी रुपये अनसिक्युरर्ड लोन दाखवून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लिमिटेड या कंपनीला दिले गेले. त्यासाठी ईडीने काही जागांवर सर्च देखील केलं होतं. नंदकिशोर चतुर्वेदी ही व्यक्ती काही अद्याप सापडलेली नाही अजून. हे समोर आल्यानंतर आता हे समजून येतं की, जे पैसे साईबाबा गृहनिर्मिती कंपनीला दिले होते तोच पैसा महेश पटेल, नंदकिशोर चतुर्वेदी यांनी रियल इस्टेट प्रोजेक्टमध्ये जो निलांबरी प्रोजेक्ट आहे किंवा साईबाबा गृहनिर्मिती यांचे जे प्रोजेक्ट आहेत त्यात गुंतवले.

हवाला मार्फत जे पैसे आले होते तेच पैसे त्यांनी गुंतवले होते. त्यात साईबाब गृहनिर्मिती कंपनीचा रोल समोर आल्याने आता 6.45 रुपये किंमतीचे 11 फ्लॅट ईडीने जप्त केले आहेत.

ईडीचं म्हणणं आहे की, महेश पटेल नावाचे एक व्यावसायिक आहेत त्यांनी जे पैसे होते पुष्पक ग्रुप कंपनी नावाची एक कंपनी आहे त्या कंपनीतून काही पैसे उचलले ज्याला आपण सायफननॉफ म्हणतो किंवा फिरवले आणि चुकीच्या मार्गाने फिरवले. हेच पैसे नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याशी संगनमत करुन हमसफर डिलर प्रा. लिमिटेड या कंपनीच्या मार्फत श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लिमिटेड यांना लोनच्या मार्फत दिले.

ईडीचं म्हणणं आहे की, साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी चालवणारे कोण आहेत, मालक कोण आहेत या कंपनीचे तर श्रीधर पाटणकर हे या कंपनीचे मालक आहेत. पण ROC मध्ये पाहिल्यावर लक्षात येतं की, पाच संचालक आहेत या कंपनीचे. त्यात श्रीधर पाटणकर यांचा उल्लेख नाही. कदाचित ते आधी डायरेक्टर असतील. पण ईडीचा दावा आहे की, ही कंपनी श्रीधर पाटणकर हेच चालवतात.

maharashtra politics big sensation a photo of uddhav thackeray and chandrakant patel was tweet by somaiya
कारवाईचा फास आवळला जाणार? ED नंदकिशोर चतुर्वेदीविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट काढण्याच्या तयारीत

यामध्ये असं समजून येतंय की, नंदकिशोर यांच्याशिवाय चंद्रकांत पटेल किंवा पुष्पक बुलियनमध्ये ऑपरेट करणारी जी लोकं होती आणि श्रीधर पाटणकर यांचा जो रोल आहे तो चतुर्वेदी यांच्याकडून येतो.

नंदकिशोर चतुर्वेदी हा अद्यापही देखील फरार आहे. ईडीचे अधिकारी त्याचा शोध घेत आहेत पण तो अद्यापही सापडलेला नाही. काही दिवसांआधी रेड झाल्या होत्या. खरं म्हणजे चतुर्वेदी हा मोठा हवाला ऑपरेटर आहे.

ईडीने याबाबत श्रीधर पाटणकर यांना समन्स बजावले होते. पण ते काही समोर आले नव्हते. त्यानंतर जेव्हा ईडीला काही पुरावे मिळाले किंवा नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या शेल कंपनीची लिंक मिळाली त्यानंतर या जप्ती करण्यात आल्या आहेत. आता पुढे श्रीधर पाटणकर यांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in