Covid 19 : काळजी घ्या, कोरोना प्रसाराचा वेग वाढला! महाराष्ट्रात आढळले 11,877 कोविड रूग्ण
maharashtra recorded 11877 new corona patients and 9 deaths 2 jan 2022प्रातिनिधीक छायाचित्र

Covid 19 : काळजी घ्या, कोरोना प्रसाराचा वेग वाढला! महाराष्ट्रात आढळले 11,877 कोविड रूग्ण

Today Maharashtra corona patients: पाहा महाराष्ट्रात दिवसभरात किती कोरोना रुग्ण सापडले.

महाराष्ट्रात प्रचंड वेगाने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं सध्या दिसून येत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात कोरोनाची तिसऱ्या लाट आली असल्याचं बोललं जात आहे. कारण आज (2 डिसेंबर) दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल 11877 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात राज्यात 9 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 2.11 टक्के एवढा झाला आहे.

आज दिवसभरात 2069 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 65 लाख 12 हजार 610 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.21 टक्के झाले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 92 लाख 59 हजार 618 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 99 हजार 868 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 43 हजार 250 व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत. तर 1064 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

महाराष्ट्रात दिवसभरात ओमिक्रॉनचे 50 रूग्ण आढळले आहेत. या रूग्णांचे अहवाल बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी रिपोर्ट केले आहेत. हे 50 रूग्ण पुणे ग्रामीणमध्ये 2, पिंपरीत 8, पुणे महापालिका क्षेत्रात 36 असे आहेत. राज्यात ओमिक्रॉन रूग्णांची एकूण संख्या 510 झाली आहे.

कुठे आहेत 510 रूग्ण

 • मुंबई-328

 • पिंपरी-36

 • पुणे ग्रामीण-23

 • पुणे मनपा-49

 • ठाणे मनपा-13

 • नवी मुंबई, पनवेल- प्रत्येकी 8

 • कल्याण डोंबिवली-7

 • नागपूर, सातारा-प्रत्येकी 6

 • उस्मानाबाद-5

 • वसई-विरार-4

 • नांदेड-3

 • औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी, मीरा भाईंदर- प्रत्येकी 2

 • लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर-प्रत्येकी 1

यातील 26 रूग्ण प्रत्येकी एक पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहेत. सात रूग्ण ठाणे, चार रूग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत तर नऊ रूग्ण विदेशी नागरिक आहेत. यापैकी 193 रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर टेस्ट चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 2284 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 134 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यात आज रोजी एकूण 42,024 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात 11,877 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात 66,99,868 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईत कोरोना रूग्णसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. दिवसभरात 8063 रूग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 578 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात शून्य रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

maharashtra recorded 11877 new corona patients and 9 deaths 2 jan 2022
Covid-19: मुंबईत दिवसभरात सापडले तब्बल 8 हजार नवे कोरोना रुग्ण, लवकरच होणार लॉकडाऊन?

मुंबईत आत्तापर्यंत एकूण 7 लाख 50 हजार 736 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबईत आत्तापर्यंत एकूण 16 हजार 377 मृत्यू झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 94 टक्के इतका झाला आहे. मुंबईचा डबलिंग रेट 183 दिवसांवर आला आहे. मुंबईत सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या आता 203 इतकी झाली आहे. तर झोपडपट्टी आणि चाळींमधल्या कंटेन्मेंट झोनची संख्या 09 झाली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in