
महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात ४ हजार २४ रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात ३ हजार २८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण ७७ लाख ५२ हजार ३०४ रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९७.८९ टक्के झाला आहे.
महाराष्ट्रात दिवसभरात २ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर १.८६ टक्के झाला आहे. आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या ८ कोटी १४ लाख २८ हजार २२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९ लाख १९ हजार ४४२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत २२९३ नव्या रूग्णांची नोंद
मुंबईत २२९३ नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे.
BA.5 व्हेरिएंटचे आणखी ४ रूग्ण
BJ मेडिकल कॉलेज पुणे यांनी दिलेल्या अहवालानुसार राज्यात BA.5 या व्हेरिएंटचे चार आणखी रूग्ण आढळले आहेत. हे चार रूग्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या शहरांमधले आहेत. या सगळ्या रूग्ण या महिला आहेत. या सगळ्या महिला १९ ते ३६ या वयोगटातले रूग्ण आहेत.
२६ मे ते ९ जून या कालावधीत हे सगळे रूग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात १९ हजार २६१ सक्रिय रूग्ण आहेत.
राजेश टोपे यांनी काय म्हटलं आहे?
राज्यात कोरोना रूग्णसंख्येत वाढ होते आहे. ही रूग्णवाढ ठराविक जिल्ह्यांपर्यंत मर्यादित आहे. राज्यात वाढणाऱ्या कोरोना रूग्णांमध्ये ओमिक्रॉन व्हायरसचे व्हेरिएंटचे आढळून येत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड या मर्यादित जिल्ह्यात रूग्ण वाढत आहेत. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ४० टक्क्यांवर गेला आहे. आरोग्य विभाग यावर लक्ष ठेवून आहे.
राज्यात रूग्णवाढ होत असली तरीही रूग्णालयात दाखल होण्याची टक्केवारी ही दोन ते तीन टक्के इतकीच आहे असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
आरोग्य विभाग पुन्हा सतर्क झाला असून हर घर दस्तक या सूचनेप्रमाणे आशा वर्कर आणि आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन लसीकरणाची माहिती घेऊन लसीकरणाचे प्रमाण वाढवत आहोत. राज्यात शाळा सुरू झाल्यामुळे १२ ते १८ वयोगटामुळे मुलांचं लसीकरण झालं नसल्यास ते पूर्ण करून घेण्याच्या सूचना पालक आणि शिक्षकांना देण्यात येत आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.