Maharashtra Corona Cases: महाराष्ट्राची चिंता वाढली, सापडले 4 हजाराहून अधिक रुग्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्राची (Maharashtra) चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. कारण मागील 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)4057 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसतं आहे. महाराष्ट्र सरकारने जवळजवळ लॉकडाऊन हटवला आहे. मात्र, असं असताना कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा कमी होत नसल्याचं दिसून येत आहे.

गेल्या 24 तासात तब्बल 67 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,37,774 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 4057 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील काही महिन्यात रुग्णांची आकडेवारी घटत होती. पण आता गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा 4 ते 5 हजार रुग्ण पुन्हा एकदा सापडू लागले आहेत. राज्यातील नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात सध्या 50 हजार 095 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यात 5 सप्टेंबर रोजी 5916 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 62,94,767 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.05 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 67 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.12 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,48,54,018 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,86,174 (11.82 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,99,905 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2007 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 50,095 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

ADVERTISEMENT

  • मुंबई (Mumbai) – 4 हजार 003

  • ठाणे (Thane) – 7 हजार 273

  • पुणे (Pune) – 12 हजार 325

  • नागपूर (Nagpur) – 56

  • नाशिक (Nashik)- 849

  • कोल्हापूर (Kolhapur) – 1 हजार 133

  • अहमदनगर (Ahmednagar) – 5 हजार 701

  • सातारा (Satara) – 6 हजार 603

  • सांगली (Sangli)- 3 हजार 251

  • औरंगाबाद (Aurnagabad)- 477

  • ‘राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो’, लॉकडाऊनवरुन मुख्यमंत्र्यांनी कोणाला सुनावलं?

    प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 12 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय ठाणे आणि सातारा जिल्ह्यात 6 हजाराहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे अहमदनगरमध्ये देखील सध्या 5 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

    मुंबईत दिवसभरात सापडले 496 रूग्ण पॉझिटिव्ह

    मुंबईत दिवसभरात 496 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 237 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 7 लाख 46 हजार 346 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97 टक्के आहे. डबलिंग रेट 1363 दिवसांवर गेला आहे

      follow whatsapp

      ADVERTISEMENT