Maharashtra SSC Result 2021: अखेर 10 वीचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण निकाल 99.95 टक्के

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: Maharashtra SSC Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2021 परीक्षेच्या निकाल 16 जुलै 2021 जाहीर करण्यात आला आहे. (Maharashtra SSC result 2021) यंदाच्या निकालाची खासियत म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच आपलं निकाल पत्र हाती मिळणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अंतर्गत मुल्यमापनाच्या जोरावर मुलांना यंदा दहावीचे गुण देण्यात आले आहेत.

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे यंदाचा निकाल लावण्यात आला आहे. बोर्डाने नुकतीच या निकालांची घोषणा केलेली आहे. यावेळी राज्यात दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत त्यांचं पास होण्याचं प्रमाण अधिक आहे. राज्यात ८३ हजार २६२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.

राज्यात मुलींचा निकाल हा ९९.९६ टक्के लागला असून मुलांचा निकाल हा ९९.९४ टक्के इतका लागला आहे अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

SSC Result 2020: विभागानुसार निकाल

कोकण – १०० टक्के (सर्वाधिक निकाल)

ADVERTISEMENT

नागपूर – ९९.८४ टक्के (सर्वात कमी निकाल)

ADVERTISEMENT

यंदाच्या दहावीच्या निकालाची प्रमुख वैशिष्ट्य –

  • यंदाच्या निकालातही विद्यार्थिनींची बाजी – ९९.९६ % विद्यार्थिनी उत्तीर्ण

  • ९९.९४ % विद्यार्थी उत्तीर्ण

  • नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी

  • कोकण विभागाचा निकाल १०० टक्के

  • दहावीच्या २७ विषयांचा निकाल १०० टक्के

  • २२ हजार ३८३ शाळांचा निकाल १०० टक्के

  • ८२ हजार ३६२ विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण

  • ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

  • दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७ टक्के

प्रथमच कोरोना महामारी संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. परिणामी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांच्या वर्षभरातील तसेच आधीच्या वर्षाच्या कामगिरीच्या आधारे करण्यात आले. अकरावी प्रवेशांसाठी ऐच्छिक सीईटी घेतली जाणार आहे.

10वी निकालाची तारीख, वेळ (Maharashtra SSC Result 2021 Date and Time)

महाराष्ट्र एसएससी निकाल 2021 Maharashtra SSC Result 2021 – 16 जुलै 2020 (शुक्रवार) दुपारी 1:00 वाजता

Maharashtra SSC Result 2021: MSBSHSE 10th निकालाविषयी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी

10वी निकालाची तारीख, वेळ (Maharashtra SSC Result 2021 Date and Time)

  • महाराष्ट्र एसएससी निकाल 2021 Maharashtra SSC Result 2021 – 16 जुलै 2020 (शुक्रवार) दुपारी 1:00 वाजता

  • नेमका निकाल कसा पाहता येणार?

  • सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन

  • होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र दहावीचा निकाल 2021 या लिंकवर क्लिक करा.

  • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.

  • यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो सीट नंबर किंवा नोंदणी क्रमांक देण्यात आलेला असेल तो टाकावा लागेल.

  • त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना सब्मिट हे बटण दाबावं लागणार आहे.

  • समजा, तुमचा सीट नंबर M234897 असेल आणि तुमच्या आईचे नाव मनिषा असं असेल तर तुम्ही M234897 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच MAN असं टाकावं लागेल.

  • त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल काही क्षणात आपल्याला दिसेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT